Mumbai : शरद पवारांच्या एकेरी उल्लेखानंतर अखेर राम सातपुतेंनी मागितली माफी…

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप आमदार राम सातपुते यांनी  सभागृहात एकेरी उल्लेख केला. सध्याचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन  यावरुन भाजप आमदार राम सातपुते यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना जाहीर माफी मागावी लागली. विशेष म्हणजे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 02T165358.510

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 02T165358.510

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप आमदार राम सातपुते यांनी  सभागृहात एकेरी उल्लेख केला. सध्याचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन  यावरुन भाजप आमदार राम सातपुते यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना जाहीर माफी मागावी लागली. विशेष म्हणजे भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम सातपुते तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळे याची आठवण करून दिली. यावेळी बोलताना आव्हाड यांनी माझ्याकडे तुच्छतेने हात केला, असा आरोप सातपुतेंनी केला. यानंतर सातपुते मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले आहे  ‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’ असा एकेरी उल्लेख केला. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षांना वक्तव्य तपासून सांगेपर्यंत असा नवीन पायंडा तयार करता आहात का असा सवाल यावेळी केला.

Mumbai : विधानसभेत शरद पवारांचा एकेरी उल्लेख, राष्ट्रवादीच्या आमदारांचा गदारोळ

राम सातपुते यांनी माफी मागावी यासाठी राष्ट्रवादी आमदार आक्रमकच राहिले. माफी मागेपर्यंत आमदार घोषणाच देत राहिले. शेवटी विधानसभा अध्यक्षांनी राम सातपुते यांना सूचना केली. यावर माझा कोणत्याही नेत्याच्या भावना दुखवण्याचा उल्लेख नव्हता. माझ्याकडून चुकून उल्लेख झाला असेल तर मी माफी मागतो, असे ते म्हणाले आहेत. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.

Exit mobile version