मुंबई महानगर पालिका सरसावली, पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटर सुरू

मुंबई : देशात कोरोना (Coronavirus) रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोरोनाची ही रूग्णसंख्या वाढण्यामागे कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB.1.16 असल्याचं सांगितलं जात आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोनाचा हा व्हेरिएंट चिंताजनक आहे. जगभरात XBB.1.16 व्हेरिएंटचे सर्वात जास्त रूग्ण भारतात आहेत. दरम्यान आता मुंबई महानगर पालिकेने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे. ज्या पद्धतीने […]

Corona Update Maharashtra

Corona Update Maharashtra

मुंबई : देशात कोरोना (Coronavirus) रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोरोनाची ही रूग्णसंख्या वाढण्यामागे कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB.1.16 असल्याचं सांगितलं जात आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोनाचा हा व्हेरिएंट चिंताजनक आहे. जगभरात XBB.1.16 व्हेरिएंटचे सर्वात जास्त रूग्ण भारतात आहेत.

दरम्यान आता मुंबई महानगर पालिकेने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे. ज्या पद्धतीने महापालिकेने कोरोना काळात योग्य पद्धतीने नियोजन केलं होतं. त्याप्रमाणे पुन्हा एकदा नियोजन करायाला सुरूवात केली आहे. मुंबईत पुन्हा एकदा तीन जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रूग्णालय आणि इतर ठिकाणी हे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.

Corona Guidelines : आता कोरोना झाल्यास ‘ही’ औषधं घेणं टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईड लाईन्स जारी

यामध्ये बेड्सची सुविधा,योग्य उपचार इतर सुविधा या जम्बो कोविड सेंटरमध्ये असणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईत एच3 एन2 चा प्रभाव देखील मुंबईत वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका ठिकठीकाणी बेडची संख्या महापालिकेकडून वाढवण्यात येत आहे. रूग्णालयांसह कोरोना नियंत्रण कक्षही पुन्ह सुरू करण्यात येणार आहे.

Exit mobile version