निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना अन् गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली; अनेक चर्चांना उधाण

Yogesh kadam :  गुंड निलेश घायवळ प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निलेश घायवळ विदेशात पळून गेल्याने विरोधक राज्य

Yogesh Kadam

Yogesh Kadam

Yogesh kadam :  गुंड निलेश घायवळ प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निलेश घायवळ विदेशात पळून गेल्याने विरोधक राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुक परवाना देण्यात आल्याने विरोधक आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका करताना दिसत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात आला असल्याची माहिती समोर आल्याने विरोधक या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर निशाणा साधत आहे.

शस्त्र परवाना प्रकरणात विरोधक चारही बाजूने टीका करत असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh kadam) यांनी स्पष्टीकरण दिले देत  सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते म्हणून त्यांना परवाना देण्यात आला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.

योगेश कदम यांनी एक्स वर म्हटले आहे की, शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे.म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे.

तर दुसरीकडे पोलिसांच्या विरोधानंतरही सचिन घायवळला (Sachin Ghaywal) शस्त्र परवाना देण्यात आला असल्याची चर्चा देखील सध्या जोराने सुरु आहे. माहितीनुसार, सचिन घायवळला 20 जून रोजी शस्त्र परवाना देण्यात आला होता. मात्र यापूर्वी देखील त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला शस्त्र परवाना कसं मिळाला असा प्रश्न आता विरोधक विचारात आहे.

… म्हणून पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

Exit mobile version