‘सावली’ बार गृहराज्यमंत्री योगेश कदमांना बदनाम करणार? काय आहे संपूर्ण प्रकरण…

  • Written By: Published:
‘सावली’ बार गृहराज्यमंत्री योगेश कदमांना बदनाम करणार?  काय आहे संपूर्ण प्रकरण…

Yogesh Kadam and Savali Bar Mumbai: तारीख 30 मे 2025. ठिकाण मुंबईतील कांदिवली. येथील एका बारवर समतानगर पोलिसांचा रात्री अकराला छापा पडतो. या बारमध्ये तब्बल 22 बारबाला आढळतात. मुंबईत डान्सबारला बंदी आहे. परंतु छुप्या पद्धतीने या डान्सबार सुरू होता. पोलिस मॅनेजरवरही कारवाई करतो. पण हा बार कुणाच्या मालकी हा प्रश्न येतो. तेव्हा एक मोठं नाव समोर येतं. या बारचा परवाना ज्योती रामदास कदम यांच्यावर नावावर असतो. म्हणजे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या पत्नी आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या मातोश्रीच्या नावावर. त्यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी हा प्रश्न विधानपरिषदेत घेत योगेश कदम यांना घेरले. डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे, असा सवाल परबांचा होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर द्यावे लागले. परंतु हे संपूर्ण प्रकरण काय आहे ? माजी मंत्री रामदास कदमांनी काय धक्कादायक खुलासा केलाय हेच व्हिडिओतून जाणून घेऊया…

रात्री छापा ते पहाटेपर्यंत कारवाई…
कांदिवलीतील सावली बारवर 30 मेच्या रात्री समतानगर पोलिसांनी छापा टाकला. त्यात अश्लिल नृत्य करणाऱ्या 22 बारबाला, 22 ग्राहक, वेटर, कॅशियर आणि मॅनेजरला अटक करतात. ही कारवाई रात्री अकरा ते पहाटे चारपर्यंत सुरू होती. याप्रकरणात मॅनेजरने जबाब नोंदविण्यात येतो. बारचा परवाना ज्योती कदम यांच्यावर नावावर असल्याचा जबाब मॅनेजरचा आहे.


धक्कादायक! इंटरनेटशिवायही होतो सायबर हल्ला; मामोना रॅन्समवेअरचा धोका कसा टाळायचा? जाणून घ्या…


अनिल परबांकडून मंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी सावली बारचा विषय उचलून धरला. सावली बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत. एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही अनिल परबांची आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. परब यांनी सर्व पुरावे द्यावे, ते तपासून चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिलंय. (Yogesh Kadam and Savali Bar Mumbai)

माजी पंतप्रधानांच्या नातीची 11 श्रीमंत सेलिब्रिटींसोबत अधुरी प्रेम कहाणी, सध्या मात्र पडली एकटी


होय सावली बार पत्नीचाच नावे-रामदास कदम

परबांच्या आरोपांना आता माजी मंत्री रामदास कदम यांनी उत्तर दिलंय. गेल्या 30 वर्षांपासून शेट्टी नावाचा व्यक्ती आमचा सावली बार चालवतो. माझ्या पत्नीच्या नावावर लायसन्स आहे. पण ते ऑर्केस्ट्राचं लायसन्स आहे. मुलींचं वेटरचं लायसन्स आहे. ते अनधिकृत नाही. तिथे डान्स चालत नाही. मात्र, मला एक गोष्ट कळली ती अशी आहे की, एका कस्टमरने एका मुलीवरती पैसे उधळले होते. ती गोष्ट जेव्हा मला कळली तेव्हा मी पोलिसांना तत्काळ ऑर्केस्ट्राचं लायसन्स, त्या मुलींचे लायसन्स पोलिसांना पुन्हा सबमिट करून टाकले. ते हॉटेल बंद करून टाकले, असा खुलासा रामदास कदमांचा आहे. तर त्यांनी परबांवर हल्लाबोल केलाय. आमच्यावरती जे आरोप केले गेले, ते बेछुट आहेत, मला वाटतं, तुमचे अर्धवट वकील आहेत, त्यांना कायदा माहिती नाही. कायद्यामध्ये दिले आहे, जर एखाद्या इसमाला ते चालवण्यासाठी दिले असेल तर तो चालक जबाबदार असतो, मालक जबाबदार नसतो, असे रामदास कदम यांनी म्हटलंय. तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहे. हा बार कदम कुटुंबाने दुसऱ्याला चालवण्यास दिलेला असला तरी या बारमुळे विरोधकांच्या हातात एक आयते कोलीत आलेले आहे हे नक्की. त्यामुळे भविष्यातही यावर वादंग होऊ शकतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube