नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात एच3 एन2 म्हणजेच एन्फ्लूएंझा या आजाराने चिंता वाढवली आहे. त्यामध्ये आता कोरोनाने देखील डोकं वर काढलं आहे. अनेक राज्यांत पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असल्याने सरकारने त्यासंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान आता कोरोना झाल्यास कोणती औषधं घ्यावी आणि कोणती नाही याविषयी देखील आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या देशात प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी लोपीनविर-रिटोनावीर, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आयव्हरमेक्टिन, मोलनुपिराविर, फॅविपिरावीर, अझिथ्रोमायसिस आणि डॉक्सीसायक्लिन यांसारख्या औषधांचा वापर करण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं आहे.
त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाने प्लाझ्मा थेअरीचा वापर टाळण्याचे देखील सांगितले आहे. हे सर्व बदल आणि कोरोना संदर्भात नव्या गाईड लाईन्स जारी करण्यासाठी 5 जानेवारीला एआयआयएमएस, आयसीएमआर आणि कोविडच्या टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये डॉक्टरांना अॅंटीबायोटीक आणि प्लाझ्मा थेअरीचा वापर टाळण्याचे देखील सांगितले गेले. त्यामुळे आता आरोग्य मंत्रालयाने कोरोना संदर्भात नव्या गाईड लाईन्स जारी केल्या आहेत.
Corona Update : राज्याची चिंता वाढली, कोरोना रूग्णांमध्ये तब्बल ‘एवढी’ वाढ
या औषधांचा वापर टाळण्यामागील कारणं म्हणजे या अॅंटीबायोटीकमुळे रूग्ण तातपुरते कोरोना मुक्त जरी होत असले तरी देखील त्याचे त्यांच्या शरीरावर दुरगामी परिणाम होतात. इतर आजार बळावण्याची शक्यता असते. अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती देखील यामुळे क्षीण झाली असून पोस्ट कोविडच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.