Download App

Sukhna Dam: मराठवाड्याला कोरड; सुखना धरणात ठणठणाट, तीस गावांवर पाणीसंकट

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सुखना धरण कोरड झाल्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाई. तसंच, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय.

Image Credit: Letsupp

Marathwada Water Crisis : दुष्काळाच्या झळा आणि मराठवाड्यातील (Marathwada) पाणी टंचाईचं हे एक समीकरण आहे. उन्हाचा जसा जसा पारा वाढतो तशा-तशा शेतजमीला भेगा पडत जातात. आणि विहीरी, बोर तळ गाठतात. मे महिन्यात तर हे संकट अधिक गडद झालेलं असत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेलं सुखना धरण पूर्णपणे आटलय. त्यामुळे येथील सुमारे तीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एरणीवर आलाय. टँकरच्या पाण्यावर लोकांना अवलंबून राहावं लागत असल्यानं चांगला पाऊस होईपर्यंत पिण्याच्या आणि जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता वाढलीये. (Water Crisis) त्याचबरोबर मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आलीय. या संकटाच्या पार्श्वभूमीवर धरणात असणारा पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी होत असताना त्याकडं दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

दुष्काळाचा दाह : टँकरच्या पाण्यावर भागतेय तहान, धरणेही खपाटीला ! जायकवाडीत किती पाणीसाठा ?
11 वर्षांनी पुन्हा कोरड

सुखना धरण हे सध्या कोरडंठाक पडलंय. संभाजीनगर तालुक्यातील हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रकल्प असलेलं आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ५४२.८२ मी इतकी साठवण क्षमता असलेलं धरण हे धरण कोरडं पडल्याने २५ ते ३० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र झालाय. गेल्या दीड महिन्यापासून उन्हाचा पारा रोज वाढतोय. तशी जमीन अधिक कोरडी पडत चाललीये. परिणामी धरण क्षेत्रात कोरड्या जमिनीला अक्षरशः मोठ्या-मोठ्या भेगा पडल्यात. एक एक फूट खोल भेगा पडल्यानं दुष्काळाची दाहकता तीव्र झाल्याचं दिसतय. या अगोदरही असं संकट आलं होतं. २०१३ मधे पडलेल्या दुष्काळाच्या वेळी हा मध्यम प्रकल्प कोरडा झाला होता. त्यानंतर आता ११ वर्षांनी ही परिस्थिती निर्माण झाली झालीय.

जनावरांना पाणी कुठून आणणार?

पाटबंधारे विभागानं धरणात असलेल्या पाण्याचं नियोजन केलं असतं तर नागरिकांना हा त्रास झाला नसता अशी माहिती गारखेडा गावातील ग्रामस्थांनी दिली. जानेवारी महिन्यात मुबलक पाणी असताना गावकऱ्यांचा विरोध असताना देखील आवर्तन सोडण्यात आलं, परिणामी एप्रिल महिन्यापासून पाणी आटल्याने धरण कोरडं पडलं असं थेट नागरिक बोलत आहेत. माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना मुक्या जनावरांसाठी पाणी आणायचं कुठून? असा कठीण प्रश्न गावकऱ्यांसमोर उपस्थित झालाय. तसच, येथील मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांवरही हे एक मोठ संकट आहे. अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाह या व्यवसायावर असल्याने त्यांच्यासमोरही प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात पावसाची स्थिती बिकट, पाणीटंचाईचा प्रश्न उद्गभवणार? पापाणीसाठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर
सुमारे ९६१ गावांत पाणीटंचाईचं संकट

उन्हाचा रोजचा वाढता पारा पाहता दुष्काळाची दाहकता अधिक वाढलीय. सध्या मराठवाड्यातील अनेक गावांमधे टँकर सुरू करण्यात आलेत. या विभागात जवळपास १७५८ टँकर सुरू असून त्यावर लोक आपली तहान भागवत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १२ लाख ग्रामस्थांना टँकरचा पाणीपुरवठा सुरू होता. १५ दिवसांत ३३४ टॅकर वाढले आहेत. तर, तीन लाख ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. विभागाचा पाण्याबाबत आढावा घेतला असता, १४४ लघु आणि मध्यम प्रकल्प पूर्णतः कोरडे झालेले आहेत. तर दुसरीकडे भूजल पातळी देखील कमालीची घटली आहे. गोदावरी पात्रातील पंधरा बंधाऱ्यांमध्ये १८% उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. तर सर्वात मोठं असलेलं जायकवाडी धरणानेही तळ गाठायला सुरुवात केली असून केवळ ६% टक्के इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे येणाऱ्या काळात अजून पाणीटंचाई तीव्र होते की काय अशी भीती व्यक्त केली जातीय.

Tags

follow us

वेब स्टोरीज