Maharashtra Government Open Pathway For Youth In Germany : आयुष्यात पुढे जाण्यासाठी अनेकजण दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून जीवतोड अभ्यास करतात. यातील काही टक्केचं लोकांना हवी तशी नोकरी मिळण्यात यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा येते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काहीजण देशातच तर काही सातासमुद्रापार जाऊन नोकरी करतात. मात्र अनेकांचे विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. अशाच परदेशात नोकरी (Job Opportunity) करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरूणांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, जर्मनीतील (Germany) बाडेन बुटेनबर्ग राज्याशी करार केला आहे. या करारामुळे लाखो बेरोजगार तरूणांना परदेशात नोकरीची द्वारं खुली होणार आहेत. हा करार नेमका काय? कोण-कोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत आणि त्या कशा शोधायच्या याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जर्मन शिका, 4 लाख नोकऱ्या वाट बघतायत; अजितदादांचा बेरोजगारांना परदेशात जाण्याचा सल्ला
राज्य सरकार आणि बाडेन वूटेनबर्गचा करार नेमका काय?
युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. ही कमतरता महाराष्ट्रातील युवक आणि युवतींना प्रशिक्षण देऊन पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर या सर्वांना जर्मनीला नोकरीसाठी पाठवले जाणार आहे. करारानुसार, बाडेन बुटेनबर्ग या राज्याने नोंदविलेल्या मागणीच्या आधारे विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, ऊर्जा व पर्यावरण, आरोग्य, हॉटेल व्यवस्थापन अशा प्रमुख क्षेत्रांसासाठी राज्यातून कुशल मनुष्यबळ जर्मनीला पाठवले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात मिळणार 10 हजार तरूणांना संधी
बाडेन बुटेमबर्गचे सेवा कार्यालय पुण्यात सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाकडे जर्मनीतून आवश्यक मनुष्यबळाची मागणी केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात यामाध्यमातून जवळपास 10000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
Amazon सारख्या कंपन्या किरकोळ विक्रेत्यांच्या मुळावर.. भाजपाच्या मंत्र्याने पुरावेच दिले
कोण-कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी?
बाडेन बुटेनबर्ग आणि राज्य सरकारच्या करारांतर्गत हेल्थकेअर क्षेत्रातील परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक (एमएफए), प्रयोगशाळा, रेडियोलॉजी, दंतशल्य सहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रूषा सेवक, फिजिओथेरपीस्ट, दस्तऐवज आणि संकेतीकरण, लेखा व प्रशासन आदींसाठी मनुष्यबळ पाठवले जाणार आहे. तर, हॉस्पिटॅलिटी अंतर्गत वेटर्स, रिसेप्शनिस्ट, आचारी, हॉटेल व्यवस्थापक, हाऊसकीपर, क्लीनर आदी ठिकाणी नोकरीची संधी दिली जाणार आहे. याशिवाय इलेक्ट्रिशियन, रंगारी, सुतार, वाहन दुरूस्ती मेकॅनिक यांसह वाहन चालक (बस, ट्रेन, ट्रक), सुरक्षा रक्षक, विमानतळावरील सहाय्यक आदी ठिकाणी राज्यातील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
नोकरी मिळेल पण भाषेचं काय?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, वाढत्या बेरोजगारीत परदेशात नोकरीची संधी मिळतीय तर चांगलीच गोष्ट आहे. पण तिथे गेल्यानंतर स्थानिक नागरिकांशी नेमका कोणत्या भाषेत संवाद साधायचा? तुम्हाला पडलेला प्रश्न अगदी बरोबर आहे पण, याची काळजी अजिबात करू नका कारण तुम्हाला जर्मनीत पाठवण्याआधी राज्य सरकार तुम्हाला जर्मन भाषा शिकवणार असून, ती पण तुमच्याच्या जिल्ह्यात आणि तेपण अगदी मोफत.
बेरोजगार राहू पण… Cognizant ने ऑफर केलेल्या अडीच लाखांच्या पॅकेजवर फ्रेशर्सचा संताप
कुठे मिळणार भाषेचे शिक्षण
जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्यातील गोएथे इन्स्टिट्यूट आणि मॅक्समुलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून, संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या व पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर जर्मन भाषा शिकवणीचे 5 वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहेत. जर्मन भाषा शिकण्यासाठीचा प्रशिषण कालावधी 4 महिन्यांचा गृहित धरण्यात आला असून, ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांना जर्मन भाषेसाठी सरकारकडून 7 हजार तर, शहरी भागातील विद्यार्थ्यांना 10 हजार दिले जाणार आहेत.
शिक्षणाची अट काय? फॉर्म कसा आणि कुठे भरयचा?
सर्वात प्रथम जर्मनीत नोकरी करण्यासाठी तुम्हाला जर्मन भाषा शिकवण्यासाठी https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शैक्षणिक गोष्टींपासून नोकरीच्या अनुभवापर्यंतची सर्व माहिती भरावी लागणार आहे. यानंतर संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या व पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
International Left Handers Day : डावखुरा की उजवा, कोण जास्त हुशार? जाणून घ्या, इंटरेस्टिंग फॅक्टस्..
जर्मन भाषा शिकण्यासाठी आणि तेथे नोकरीकरण्यासाठी कमीत कमी अर्जदाराचे शिक्षण हे 10 पूर्ण असणे आवश्यक आहे. फॉर्मवरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रात नोकरीसाठी इच्छूक आहे हे विचारले जाईल. ते भरल्यानंतर तुम्हाला जवळील जर्मन भाषेच्या ट्रेनिंगसाठी सेंटर विचारले जाईल ज्या भागात तुम्ही राहता तो जिल्हा किंवा शहर तुम्हाला सिलेक्ट करावे लागणार आहे. ही सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक अॅप्लिकेशन क्रमांक दिला जाईल तो लिहून ठेवावा. जर तुम्ही यासाठी पात्र ठरला तर, तुम्हाला त्याबाबत फोन, मेसेज किंवा ईमेलद्वारे कळवले जाईल.