Download App

लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठं गिफ्ट! अपात्र ठरलेल्या महिलांना दुसरी संधी? फेरपडताळणीचा…

लाडकी बहीण योजनेतून महिला आणि बालविकास विभागाने ज्या अर्जदार महिलांना अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यांची पुन्हा एकदा फेरपडताळणी करण्याचा निर्णय...

  • Written By: Last Updated:

Ladki Bahin Yojana Major Update : लाडकी बहीण योजनेतून वंचित ठरलेल्या लाखो महिलांसाठी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महिला आणि बालविकास विभागाने ज्या अर्जदार महिलांना आधी अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यांची पुन्हा एकदा फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पात्र असलेल्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळण्याची संधी मिळणार आहे.

फेरपडताळणीची प्रक्रिया सुरू

सध्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जांची तपासणी (Ladki Bahin Yojana) करत आहेत. या तपासणीत अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन किंवा पात्रतेच्या निकषांबाहेर जाऊन योजना घेतल्याचे समोर आले. यात जास्त उत्पन्न असलेल्या तसेच काही सरकारी कर्मचारी महिलांचा समावेश असल्याचे उघड झाले. अशा अर्जांना आधी अपात्र ठरवण्यात आलं होतं. यामुळे लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात नाराजी (Maharashtra Government) निर्माण झाली होती. आता मात्र या महिलांना शेवटची संधी दिली जात असून, खरी पात्रता सिद्ध झाल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळेल. तर जे अर्ज निकषांबाहेर आहेत त्यांना अंतिम नकार दिला जाणार आहे.

राज्यभरात पडताळणी

राज्य स्तरावरही अर्जांची तपासणी करण्यात आली. त्यात 26 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत. या सर्व अर्जांची पुन्हा पडताळणी होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाने महिलांना या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

अपात्रतेची मुख्य कारणं

– पात्रतेच्या वयोमर्यादेबाहेरच्या महिलांनी केलेले अर्ज
– एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी घेतलेला लाभ
– जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज
– सरकारी कर्मचारी असूनही लाभ घेण्याचा प्रयत्न

पुढे काय?

महिला व बालविकास विभागाने सांगितलं आहे की, अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून महिलांनी आपली पात्रता सिद्ध करावी. अंतिम पडताळणी पूर्ण झाल्यानंतर खरंच पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेल, तर अपात्र महिलांना कायमस्वरूपी वगळण्यात येईल.

follow us