Ladki Bahin Yojana : 4,800 कोटींचा घोटाळा! पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

Supriya Sule On Ladki Bahin Scheme Scam : लाडकी बहिण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केलाय. 4 हजार 800 कोटी रूपयांचा हा घोटाळा आहे. याची चौकशी तीन गोष्टींद्वारे केली पाहिजे. तातडीने व्हाईट पेपर, ऑडिट अन् इनवेस्टिगेशन. महाराष्ट्र सरकारने 2 कोटी 38 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला. त्यातील आता वीस लाख महिला पहिल्या (Ladki Bahin Yojana) टप्प्यात निवडणुका झाल्यानंतर काढून टाकल्या आहेत.
या योजनेत पुरूष देखील आता आलेत. डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर. पैसे थेट पुरूषांच्या खात्यात. सगळे प्रुफ देताना, हे पैसे गेलेच कसे? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केलाय. शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो, ते रिजेक्ट (Mahayuti Sarkar) होतात. मग पुरूषांचे फॉर्म कसे रिजेक्ट नाही झालं. डिजिटल इंडियात स्कॉलरशिप योजनेचे फॉर्म रिजेक्ट, विमा फॉर्म रिजेक्ट होतात. मग निवडणुकीच्या तिन महिने आधी लाडकी बहीण योजनेतील अर्ज का रिजेक्ट नाही झाले, हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे.
नांदणी ग्रामस्थ भावूक, न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणी वनताराकडे रवाना
सगळ्यात मोठा स्कॅम
शेतकरी, शिक्षक, कंत्राटदार या तिघांच्याही आत्महत्या वाढल्या आहेत. तीन महिन्यात साडे सातशे महिन्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. कर्जमाफी करणार, झाली नाही. बहिणींना पैसे दिले मी त्याचं स्वागत करते. पण पहिल्या टप्प्यात 4 हजार 800 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झालाय. महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे, डेटा सांगतोय. महाराष्ट्र सरकार यावर एसआयटी बसवा, अशी विनंती देखील यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
फॉर्म भरून कोणी घेतले? कसे घेतले?
फॉर्म भरून कोणी घेतले? कसे घेतले? 26 लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले? कोणतं सॉफ्टवेअर होतं? या घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. महिलांचा विभाग सगळ्यात चांगलं चालतंय, असं महाराष्ट्र सरकार म्हणत असेल. तर या भ्रष्ट्राचाराचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेलं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मी आदिती तटकरे यांच्यावर काहीही आरोप-प्रत्यारोप करणार नाही. हे सरकार कसं चालतं, मला माहित आहे. मी यासंदर्भात एका महिलेवर आरोप करणार नाही. ही सरकारची जबाबदारी आहे. पारदर्शकता ठेवायची, आपल्या युवा मंत्र्यांवर ढकलायचं नाही. हा घोटाळा कॅबिनेटने अप्रूव्ह केलेला आहे, असं देखील सुळे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकारने सहकार्य केलं नाही, तर संसदेत केंद्र सरकारसमोर हा विषय मांडणार, असा देखील इशारा यावेळी सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. मी कधीही खोटे आरोप केले नाही, करणार नाही. हे माझं राजकारण नाही. याची उत्तर सरकारने दिली पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. राऊंड ट्रिपिंग देखील झाली असेल, आपल्याला काय माहित? या अप्रोव्हसाठी ज्याची फायनल सही असेल, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.