Pune Crime : ‘छातीत दुखतंय’ म्हणत मीटिंगमधून बाहेर गेला, अन् इंजिनिअर तरुणाने 7व्या मजल्यावरून मारली उडी

Pune Crime : ‘छातीत दुखतंय’ म्हणत मीटिंगमधून बाहेर गेला, अन् इंजिनिअर तरुणाने 7व्या मजल्यावरून मारली उडी

Young Engineer Ends Life Jumps From Seventh Floor : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये सोमवारी (28 जुलै) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. अॅटलास कॉपको ग्रुप या नामांकित आयटी कंपनीत नुकतीच नोकरीला लागलेला 27 वर्षीय तरुण पियूष अशोक कावडे याने (Pune Crime) ऑफिसच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली (Pune News)आहे. सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी

सकाळी कामावर हजर झालेल्या पियूषने नेहमीप्रमाणे एक महत्त्वाची मीटिंग अटेंड केली. मात्र, काही वेळाने त्याने छातीत दुखत असल्याचं सांगून मीटिंग रुममधून बाहेर पडला. यानंतर काही क्षणांतच त्याने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी ( Young Engineer Ends Life) घेतली. इतक्या उंचीवरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत पियूष मूळचा नाशिकचा असून, अवघ्या एका महिन्यापूर्वीच त्याने अॅटलास कॉपको ग्रुपमध्ये नोकरी स्वीकारली होती, अशी माहिती समोर आली आहे.

मुसळधार पावसाचा कहर! मृतांचा आकडा 30 पार, 80 हजाराहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

आत्महत्या का केली?

पोलिसांनी या आत्महत्येचा तपास सुरू केला आहे. नेमकं काय कारण घडलं की, पियूषने असं टोकाचं पाऊल उचललं? याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून, सहकाऱ्यांकडूनही अधिक माहिती घेतली जात आहे. पियूष कावडे याने आत्महत्या का केली? यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तो आयटी इंजिनिअर असून, अवघ्या एका महिन्यापूर्वीच त्याने अॅटलास कॉपको ग्रुपमध्ये नोकरीला सुरुवात केली होती. नवीन कंपनी, नवीन वातावरण, आणि कामाचा दडपण या साऱ्यांचा परिणाम मानसिक आरोग्यावर झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

पाकचं पाणी बंद मग क्रिकेटचे सामने का? औवेसींचा सरकारला संतप्त सवाल

पोलिसांनी कंपनीतील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. पियूषच्या फोन आणि लॅपटॉपची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी होत्या का, सोशल मीडियावर काही हिंट होती का? याचा शोध घेतला जात आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube