पावसाने तोंड फिरवल्याने मराठवाड्यात पाणीबाणी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणामध्ये 26.93 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. तसेच जायकवाडी धरण 33 टक्के भरेपर्यंत धरणातून पाणी सोडलं जाणार नसल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
State School : राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा अहवाल समोर
राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून पावसाने कोकणासह विदर्भावरच मोठ्या प्रमाणात कृपा केल्याचं दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणावं तसा पाऊस पडला नसल्याने मराठवाड्यातील धरणे कोरडी पडल्याची स्थिती आहे. याच विभागातील छोट्या-मोठ्या प्रकल्पातही पाणीसाठा कमी असल्याचं दिसून येत आहे.
या विभागातील प्रमुख 11 धरणांमध्ये 33.48 टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेत पाणीसाठा 44.06 टक्के एवढा होता. मराठवाड्यात पाणीबाणी असल्याची परिस्थिती असल्याने प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलण्यात येत आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अपेक्षित पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. आत्तापर्यंत मराठवाड्यात 20 टक्केच पेरण्या झाल्याचं समोर आलं आहे.
‘मी चार वेळा शिवसेनेच्या उमेदवारांना पाडलं, आधी निवडून तर या’; भुजबळांचं राऊतांना उत्तर
मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये सध्या उपयुक्त जलसाठा 20.64 टीएमसी असून टक्केवारी 26.93 इतकी आहे. तर निम्र दुधना धरणामध्ये 2.19 टीएमसी आणि 26.93 इतकी टक्केवारी आहे. तसेच येलदरी धऱणांत उपयुक्त पाणी साठा : 15.86 टीएमसी तर टक्केवारी: 55.53 टक्के इतकी आहे. सिध्देश्वर धरणात उपयुक्त पाणीसाठा: 00 टीएमसी टक्केवारी: 00 टक्के आहे. माजलगाव धऱणात उपयुक्त पाणी साठा: 1.77 टीएमसी तर टक्केवारी: 16.03 टक्के आहे. तसेच मांजरा धरणांत उपयुक्त पाणी साठा: 1.47 टीएमसी तर टक्केवारी: 23.48 टक्के इतकी आहे.
यासोबतच पेनगंगा धरणात उपयुक्त पाणी साठा: 14.57 टीएमसी, तर 42.79 टक्केवारी आहे. मानार धरणामध्ये उपयुक्त पाणी साठा:1.56 टीएमसी, टक्केवारी: 31.90 टक्के आहे, निम्न तेरणा धरणांत उपयुक्त पाणी साठा: 0.92 टीएमसी, टक्केवारी: 28.47 टक्के आहे, तसेच विष्णुपूरी विष्णूपुरी धरणांत उपयुक्त पाणी साठा:1.14 टीएमसी टक्केवारी: 39.87 टक्के इतका आहे. दरम्यान, सिना कोळेगांव धरणांत उपयुक्त पाणी साठा: -0.21 टीएमसी टक्केवारी: -9.68 टक्के इतका आहे.