गेली अनेक दिवसांपासून राज्यात अनेक जमाज घटक आरक्षणाची मागणी करत आहे. (Reservation) अनेक मोर्चे आंदोलन आपण पाहिली असतील. हे सगळं सुरू असताना काही जिल्ह्यात आत्महत्याही घडल्या आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे आत्महत्येचं कारण वेगळंच असल्याचं आता समोर आलं आहे.
या सगळ्या घटनांबाबत लातूर जिल्ह्यात तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला असून ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे. आरक्षण लढ्यात ज्यांनी आपलं जीवन संपवलं, त्यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या लिहल्याचा एक मोठा प्लॅन केल्याचं उघड झालं आहे. राज्यात आरक्षण मागणीसाठी झालेल्या आत्महत्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय.
लातूर जिल्ह्यातील दोन आत्महत्या आणि एका आत्महत्येचा प्रयत्न प्रकरणात आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या संबंधितांनी स्वतः लिहिलेल्या नसून, त्या नंतर प्लांट करण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, या आत्महत्येच्या घटनांचा वापर करून काहींनी सामाजिक आणि राजकीय दबाव निर्माण करण्याचा तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न केला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
तीन प्रकरणांमध्ये आरोपींवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक आणि खोटी माहिती देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तसंच कुटुंबांना आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या हेतूने अशा प्रकारची कृती करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या सर्व प्रकरणांत गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे.
निलंगा तालुका : शिवाजी मेळे यांचा विजेच्या शेगडीला करंट लागून मृत्यू झाला होता. त्यांच्या खिशात महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली” अशी चिठ्ठी सापडली. पोलीस तपासानंतर ही चिठ्ठी त्यांच्या नातेवाईकांनी नंतर ठेवली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अहमदपूर तालुका : येथे 26 ऑगस्ट रोजी बळीराम श्रीपती मुळे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर त्यांचा जीव वाचला. मात्र, तपासात समोर आले की, त्यांच्या चुलत भावाने “मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे” अशी चिठ्ठी त्यांच्या खिशात ठेवली होती.
चाकूर तालुका : अनिल बळीराम राठोड यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या खिशात “बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या” केल्याची चिठ्ठी आढळली. तपासात ती चिठ्ठी बनावट असल्याचे उघड झाले असून, त्यांच्या तीन नातेवाईकांनी ती ठेवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लातूर जिल्ह्यातील दोन आत्महत्या आणि एका आत्महत्येचा प्रयत्न प्रकरणात आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या संबंधितांनी स्वतः लिहिलेल्या नसून, त्या नंतर प्लांट करण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.
–#latur #laturcrime #CrimeNews #Crime #LetsUppMarathi pic.twitter.com/AG2EdBwrKf— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 8, 2025