पैशाचे सोंग आणता येत नाही, मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? वडेट्टीवारांचा अजित पवारांना सवाल
Vijay Vadettiwar यांनी राज्यात ओल्या दुष्काळाची स्थिती असताना अजित पवारांच्या पैशाचे सोंग आणता येत नाही. या विधानावरून त्यांना घेरलं आहे.

Vijay Vadettiwar Criticize Ajit Pawar for Farmers Issues : एरव्ही दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यामध्ये सध्या अतिवृष्टीने थैमान घातलं आहे. शेतीसह अनेकांचे घरं अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांना ढगफुटीने जलप्रलय आल्याचे चित्र निर्माण झाला आहे. त्यामुळे कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी विरोधकांकडून सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यात कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या पैशाचे सोंग आणता येत नाही. या विधानावरून त्यांना घेरलं आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
मराठवाड्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात येते आहे अस असताना अर्थमंत्री अजित पवार भडकले म्हणाले पैशाचे सोंग आणता येत नाही, तिजोरीची अवस्था आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या करू देणार का सरकार असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगेंना शिंदे गटाने रसद पुरवली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तरं
मराठवाडा येथील अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता दौरे करत आहे पण हा केवळ देखावा आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी विचारलं किती मदत देणार सांगावे तर ते म्हणतात राजकारण करू नका! शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला यात राजकारण कुठे आहे? सरकार जर बांधावर गेल आहे तर का जनतेला ठोस आश्वासन देत नाही, मदत किती देणार हे का लपवत आहे? याचा अर्थ मदत करण्याची नियत सरकारची नाही, ही बनवा बनवी सरकार करत आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.
यंदा स्टार प्रवाहची ढिंचॅक दिवाळी गाजवणार नवी जोडीच; अफलातून जुगलबंदीतून मिळणार मनोरंजनाचा बोनस
अर्थमंत्री अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीची मागणी केल्यावर ते का भडकतात? एक वर्षाआधी निवडणुकीच्या वेळी शेतकरी कर्जमाफी करू ही घोषणा याच पक्षांनी केली होती ना? आता पैशाचे सोंग आणता येत नाही ही कारणे का देत आहेत? लाडक्या बहिणींचे कारण सरकार देत आहे मग ती योजना पण मत मिळवण्यासाठी होती ना? शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, सोयाबीनवर किड आलेली आहे. शेतकऱ्यांना पीकविमाचे पैसे मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
लडाख आंदोलन: उपोषणातून हिंसाचाराकडे, जबाबदार कोण? जेन-Z ला कोणी भडकावलं?
मराठवाड्यातील पुरात शेतकऱ्यांचे फक्त पीक गेले नाही तर जमिनी खरवडून निघाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे. यासाठी सहा महिन्याचा आमदार निधी मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार आहे अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय आमदारांनी देखील आपला आमदार निधी द्यावा असे आवाहन वडेट्टीवर यांनी यावेळी केले.