मनोज जरांगेंना शिंदे गटाने रसद पुरवली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तरं

मराठा आंदोलनाला एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी रसद पुरवली, या आरोपांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Devendra Fadanvis On Eknath Shinde

Eknath Shinde Provide Fund To Manoj Jarange : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टरवरून निर्माण झालेल्या वादावर स्पष्टता दिली आहे. त्यांनी म्हटलं की, माझ्या सहयोगी पक्षांना यामुळे कोणताच त्रास झालेला नाही. हे एक शक्तिशाली माध्यम आहे, मी छत्रपतींच्या चरणांवर फुल अर्पण करत होतो. या साध्या पोस्टरमुळे विरोधकांना प्रचंड मिरची लागली.

देवाभाऊ जाहिरातीचा नेमका अर्थ काय?

फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) पोस्टरचा अर्थ स्पष्ट करत सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठा समाजाचे नव्हते, तर अठरा-पगड जातींचे होते. त्यांचे सर्व जातींचे सैन्य होते. आपण या संदर्भात कोणत्याही एका समाजाची बाजू घेतली, तर छत्रपतींच्या विचारांना धोका निर्माण होईल. मराठा आरक्षणासंदर्भात जो निर्णय घेतला गेला त्यावेळी ओबीसी समाजाला भीती होती की त्यांचे आरक्षण (Manoj Jarange) बिघडेल, परंतु निर्णय सर्व जातींच्या हितासाठी झाला. फडणवीस म्हणाले, “माझ्या पक्षाने हा निर्णय घेतला, कोणत्याही समाजासाठी विशेष करून नाही, सर्वांना समावेश केला. ज्यांच्या मनात जातीवाद होता, त्यांना मिरची लागली.

मराठा आंदोलन आणि जरांगेंना रसद

काही दिवसांपूर्वी मुंबईत भव्य मराठा आंदोलन पार पडले. यावेळी मनोज जरांगेंना कोण रसद पुरवतो यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “माझ्याकडे अशी कोणतीही यादी आली नाही. मोठ्या प्रमाणात आंदोलन होतं, तेव्हा अनेक लोकं सहभागी होतात. मला या विषयावर जास्त भाष्य करायचं नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या लोकांकडून रसद पुरवल्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मी त्यांच्या नेतृत्वात काम केलंय, त्यांनी माझ्या नेतृत्वात काम केलंय. आमच्यात हेल्दी रिलेशन आहे.”

नगरविकास विभागाच्या फाइल्सवर खुलासा

नागरविकास विभागाच्या काही फाइल्स थांबवून ठेवल्याच्या दाव्यांविषयी फडणवीस म्हणाले, “ही संपूर्ण माहिती चुकीची आहे. कोणतीही फाईल थांबलेली नाही. एखाद्या फाइलमध्ये समस्या असल्यास मी संबंधित मंत्र्याला बोलवून दाखवतो. फडणवीसांच्या या स्पष्टतेमुळे पक्षातील संघटनांना कोणताही त्रास झालेला नाही, आणि विरोधकांकडून केलेले जातीय राजकारणाचे आरोप फिकट ठरले आहेत.

follow us