Download App

नितेश राणे ते नरहरी झिरवाळ.. चर्चेतल्या पाच मंत्र्यांना वजनदार खाती, जाणून घ्या..

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले.

Cabinet Portfolio : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात पुन्हा एकदा भाजपाचाच वरचष्मा दिसला. अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. महायुतीत नितेश राणे, भरत गोगावले, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि संजय राठोड या आमदारांची विशेष चर्चा होती. आता या आमदारांना नेमकी कोणती खाती मिळाली याची माहिती घेऊ या..

महायुतीच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं. त्यामुळे या मंत्र्यांना खातेवाटप करता आलं नाही. मात्र काल अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आलं. या खातेवाटपाचं वैशिष्ट्य म्हटलं तर ज्यांना मंत्रि‍पदाचा फारसा अनुभव नाही अशा आमदारांना मोठी खाती दिली आहेत. काही माजी मंत्र्यांची जुनीच खाती त्यांच्याकडे कायम ठेवली आहेत. तर काही माजी मंत्र्यांची राजकीय ताकद कमी करण्याचाही प्रयत्न झाला आहे.

विखे, मुंडे, महाजनांना धक्का, अजितदादांचा शब्दही खरा ठरला; खातेवाटपात नवं गणित

चर्चेतल्या पाच मंत्र्यांना कोणती खाती

भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

संजय राठोड – मृद व जलसंधारण

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

नरहरी झिरवाळ – अन्न आणि औषध प्रशासन

कुणाकडे कोणतं खातं?

कॅबिनेट मंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

7.गणेश नाईक – वन

8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण

9.संजय राठोड – मृदा व जलसंधारण

10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे – महिला व बालविकास

21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे – कृषी

23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे – कापड

26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय

27.प्रताप सरनाईक – वाहतूक

28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

31.आकाश फुंडकर – कामगार

32.बाबासाहेब पाटील – सहकार

33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री  

34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

38. योगेश कदम – गृहराज्य शहर

39. पंकज भोयर – गृहनिर्माण

follow us