छोटा चिंटू, चिकनी चमेली, तू कोण आहे रे चिल्लर; इम्तियाज जलील यांनी नगरची सभा गाजवली

Imtiaz Jaleel: मुस्लिम समाजाला शिव्या दिल्या तर आता आम्ही दाखवून देऊ. टाळी एका हाताने वाजत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही.

MIM Imtiaz Jaleel Ahilanagar Sabha Attack On Sangram Jagtap And Nitesh Rane

MIM Imtiaz Jaleel Ahilanagar Sabha Attack On Sangram Jagtap And Nitesh Rane

अहिल्यानगरमधील मुकुंदनगर भागात खासदार असदुद्दिन ओवैसी यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयएमची आज सभा पार पडली. या सभेत माजी खासदार व एमआयएमचे (MIM) नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel)यांनी नाव न घेता आमदार संग्राम जगताप व मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली.

इम्तियाज जलील म्हणाले, मुस्लिम समाजाला शिव्या दिल्या तर आता आम्ही दाखवून देऊ. टाळी एका हाताने वाजत नाही. कायदा सगळ्यांसाठी असतो.अनेक वेळा आम्हाला शिव्या दिल्या जात आहेत. आम्हाला तोंड नाही का ? आम्ही जबान आणि पाय खाणारे आहोत. आमच्याशी काय तुलना करणार आहात. आता कुणीही उठतो मुस्लिम समाजाला शिव्या घालतो. ही नवीन फॅशन आली आहे. तुम्हाला राजकारण करायचे असेल तर मुस्लिमानांना शिव्या दिल्या जातात.

राज्यातील काही लोक नवीन इमेज तयार करण्यासाठी हे करत आहे. एक छोटासा चिंटू आहे, तो बोलत होतात. आता तुमच्या शहरातील एक चिकनी चमेली बोलत आहे. तू आहेस कोण, बोलतो काय, तुझा अंदाज आहे.पण आम्ही दखल घेत नाही. तुम्ही गाडीवर जात असताना कुत्रे भुंकत असतात, अशी टीकाही इम्तियाज जलील यांनी केलीय. (MIM Imtiaz Jaleel Ahilanagar sabha attack on sangram jagtap and Nitesh Rane)


तुझ्या बापाला सोडत नाही, तू कोण आहे रे चिल्लर

जलील म्हणाले, काही जण म्हणतात आमच्या पाठीशी अजितदादा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आहेत. मोदी तुमच्या पाठीशी असतील. पण ओवैसी हे लोकसभेला डोळ्यात डोळे घालून मोदींना बघतात. तुझ्या बापाला सोडत नाही, तू कोण आहे रे चिल्लर.


डांबर आणि सिमेंट खाऊन फडफड

नगरच्या रस्त्यावरून आलो रस्ताच राहिलेला नाही. डांबर आणि सिमेंट कोण खात आहे. कलेक्टरसाहेबांनी एसी कॅबिनमधून बाहेर येऊन बघावे. जो फडफडत आहे, तोच खात आहे, असे जलील यांनी आपल्या भाषणात म्हटलंय.

वीस हजारांचे बक्षीस देतो, फडणवीस, शिंदे, अजितदादांनी रस्त्यावरून प्रवास करावा

नगर-संभाजीनगर रस्ता खूप खराब झाला आहे. या रस्त्यावरून देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी प्रवास करून दाखवावा दहा हजार नाही तर वीस हजार रुपये बक्षीस देईल, असे चॅलेंज जलील यांनी दिले आहे.

Exit mobile version