गणरायाचे विसर्जन न करता रास्ता रोको सुरू; विसर्जनादरम्यान तरूणाचा मृत्यू, आमदार जगताप आक्रमक

Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan Death अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले.

Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan Death

Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan Death MLA Sangram Jagtap protest Without Ganesh Visarjan : अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर दीपक वागसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानंतर बुधवारी निघालेली भिंगारच्या गणेशोत्सव मिरवणूक थांबवण्यात आलेली असून विसर्जन न करताच आता आक्रमक झालेल्या आमदार संग्राम जगताप यांचे नेतृत्वाखाली नगर पाथर्डी महामार्गावर रास्ता रोको सुरू झाला आहे.

राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय, प्रशासकीय कामे होणार सोपी, 21 जिल्ह्यांत 47 नवी कार्यालये

यामध्ये लाठी चार्ज करणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची करण्यात मागणी आली. मात्र आता संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली गणराया विसर्जन न करता रास्ता रोको सुरू तर यावेळी कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची बाचाबाची झाली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दीपक वाघस्कर मृत्यूप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी सौम्य लाठीमार झाला, त्या ठिकाणी दीपक वाघस्कर उपस्थित नव्हतेच. ट्रॅक्टरवर लावण्यात आलेली ट्रॉली हलत असल्याने त्यावरील मुलांना खाली उतरवण्यासाठी त्यांच्या पायावर सौम्य लाठीमारकरण्यात आला होता.

संगमनेरमध्ये भरणेंकडून नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी; शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही

लाठीमारचा व्हिडिओ व्हायरल करत दीपक वाघस्कर यांच्यावरच लाठीमार झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दीपक वाघस्कर यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर सत्य समोर येणार आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. तर दीपक वाघस्कर मृत्यूप्रकरणी भिंगार येथील तीनही गणेश मंडळांचा गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय असून आज भिंगारमध्ये बंद पाळण्यात आला.

follow us