Uddhav Thackeray Vs Rane Family : विधानसभा निवडणुकीनंतर काल मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यामध्ये महायुतीतील ३९ आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (Uddhav Thackeray) यात भाजपाच्या वाट्याला २० मंत्रिपदे आली आहेत. या २० जणांमध्ये कणकवलीचे आमदार नितेश राणे यांचाही समावेश आहे. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलाय.
नगरविकास, पर्यटन अन् आरोग्य.. शिवसेनेला मिळणार वजनदार खाती; यादीच आली समोर
काय म्हणाले नितेश राणे ?
उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय…
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामधून शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश करत कुडाळ-मालवणमधून विजयी झालेल्या निलेश राणे यांनी नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपत घेतल्यानंतर एक्सवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…
आता तरी कुणाशाही कपटीपणाने वागू नका, तुम्हाला मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल. जय महाराष्ट्र! असं ते आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत.
शिवसेनेकडून १९९५ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंशी झालेल्या वादामुळे २००५ मध्ये शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पुढे २०१९ मध्ये राणे कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातही काम करायची संधी मिळाली होती. सध्या नारायण राणे खासदार, नितेश राणे भाजपाकडून मंत्री तर निलेश राणे शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) आमदार आहेत.
श्री. उद्धव ठाकरे,
तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की… pic.twitter.com/xUVE216rlu
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) December 15, 2024