नगरविकास, पर्यटन अन् आरोग्य.. शिवसेनेला मिळणार वजनदार खाती; यादीच आली समोर

नगरविकास, पर्यटन अन् आरोग्य.. शिवसेनेला मिळणार वजनदार खाती; यादीच आली समोर

Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. नागपुरातील राजभवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या एकूण ३९ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांचा समावेश आहे. यानंतर आता खातेवाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता आहे. यातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला १२ खाती येतील अशी माहिती आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. परंतु, भाजप गृह विभाग सोडण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे शिवसेनेला अन्य विभाग मिळू शकतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडेच होते. त्यामुळे आताही नगरविकास खाते शिवसेनेला दिले जाण्याची शक्यता आहे. गृहनिर्माण, उद्योग, पर्यटन, आरोग्य, शालेय शिक्षण खाते शिवसेनेला मिळणार आहे. यातील उद्योग आणि शालेय शिक्षण ही खाती आधीही शिंदे गटाकडेच होती. सार्वजनिक बांधकाम विभाग (सा. उपक्रम वगळून), पाणीपुरवठा खातेही शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे फास्ट! जिल्ह्याला तीन कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद; नगरला मात्र एकच लाल दिवा

जलसंधारण, मराठी भाषा, खणीकर्म, माजी सैनिक कल्याण खातेही शिवसेनेला मिळणार आहेत. गृह खात्याची मागणी शिवसेनेकडून वारंवार केली जात आहे. एकनाथ शिंदे या खात्यासाठी आग्रही आहेत. मात्र हा विभाग सोडण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला आता नगरविकास विभाग दिला जाणार आहे. याशिवाय अन्य काही महत्वाची खाती शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतात.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, योगेश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट या आमदारांना आता मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

जैस्वाल अन् कदम राज्यमंत्री

कॅबिनेट मंत्र्यांत उदय सामंत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, भरत गोगावले, दादा भुसे, प्रकाश आबिटकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट यांचा समावेश आहे. तर योगेश कदम आणि आशिष जैस्वाल या दोघांना राज्यमंत्रिपदे मिळणार आहेत.

शिंदेंची मोठी खेळी! तीन दिग्गज माजी मंत्र्यांचा पत्ता कट; सहा नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

follow us
  • fb
  • instagram
  • youtube