Download App

Rohit Pawar : पीकविम्याच्या 124 कोटींना मंजुरी, रोहितदादांच्या प्रयत्नांना यश…

कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे 124.4 कोटी रुपये मंजुर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिलीयं.

Mla Rohit Pawar : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कमेला आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांच्या प्रयत्नांमुळे मंजुरी मिळालीयं. पीकविम्याचे 124.4 कोटी रुपये मंजुर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झालीयं. या प्रश्नी आमदार पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

ऑनलाइन फसवणूक विरोधात होणार जनजागृती, आयुष्मान खुराना Meta सोबत राबवणार विशेष मोहीम

मागील काही महिन्यांपूर्वी खरीप पीक विम्याचे कर्जत तालुक्यासाठी 94 कोटी 62 लाख आणि जामखेड तालुक्यातील 81 कोटी 59 कोटी रुपये मंजुर झाले आहेत. या पीकविम्याच्या एकूण रक्कमेतील कर्जतमध्ये 30 कोटी तर जामखेडमध्ये 22 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांना उर्वरीत पीक विम्याच्या रक्कमेची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. रोहित पवार यांंनी मतदारसंघात यंत्रणा राबवून शेतकऱ्यांचे अर्ज भरुन घेतले होते. एवढचं नाही तर पवार यांनी त्यासाठी पाठपुरावादेखील केला होता.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाकडून विमा कंपन्यांना प्रलंबित रक्कम देण्यात यावी आणि नुकसान भरपाईच्या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी अशी मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच उर्वरित रक्कम कर्जतसाठी 64.40 कोटी आणि जामखेडसाठी 60 कोटी रुपये मंजूर झाले असून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात बिश्नोई गँग कनेक्शन; पोलिसांनी फेसबुक अन् इन्स्टाकडून माहिती मागवली

दरम्यान, मागील पाच वर्षांचा विचार केला तर आमदार रोहित पवार यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे आणि त्यांचे प्रश्न लावून धरत ते मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना भरघोस पीक विम्याची रक्कम मिळवून दिलीच पण आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वीची मतदारसंघातील शेतकऱ्यांची रखडलेली 110 कोटी रुपये पीक विम्याची रक्कमही त्यांनी मिळवून दिली होती.

कागदोपत्रांची पुर्तता करा अडचणी आल्यास संपर्क करा – पवार
सरकार मार्फत पिकविमा उतरवला जातो परंतु नंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अनेक अडचणी येतात. यासंदर्भात मी व्यक्तीशः अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर खरीप 2023 च्या पिकविम्याची उर्वरित रक्कम कर्जतसाठी 64.40 कोटी व जामखेडसाठी 60 कोटी रुपये मंजूर झाले असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांनी आपापल्या भागातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून आपली काही कागदपत्रांची पूर्तता राहिली असल्यास करून घ्यावी जेणेकरून पिकविम्याची 100 टक्के रक्कम सर्वांच्या खात्यात जमा होईल आणि काही अडचण असल्यास माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, असं आवाहन रोहित पवार यांनी केलंय.

follow us