Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. (Baba Siddiqui) धर्मराज कश्यप, गुरमैल सिंग आणि प्रवीण लोणकर अशी त्यांची नावं आहेत. तर, मोहम्मद झीशान अख्तर, शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर हे फरार आहेत. दरम्यान, पोलीस यांच्या शोधात आहेत.
भारत सरकारचा मोठा निर्णय, 6 कॅनडा उच्चायुक्तांची हकालपट्टी, या दिवसापर्यंत देश सोडण्याचे आदेश
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचं कनेक्शन समोर आलं आहे. त्यामध्ये पुणे, हरियाणा आणि पंजाब यूनिट कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये बिश्नोई गँगचं हरियाणा आणि पंजाब यूनिट सक्रीय असल्याची माहिती समोर आलेली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर याची मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शुभम लोणकरला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं आणि चौकशी केली होती. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता त्यामध्ये शुभम लोणकरची कोणती भूमिका समोर आली नव्हती त्यामुळं त्याला सोडून देण्यात आलं.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडे माहिती मागवली
बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणात शुभम लोणकर सध्या फरार आहे. शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला पोलिसांनी अटक केली आहे. सिद्दिकी हत्या प्रकरणात प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर या दोघांचा समावेश असल्याचं स्पष्ट झालंय. सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणी पोलिसांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून माहिती मागवली आहे.