Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात मोठा ट्वीस्ट ! आरोपीच्या वयाची चाचणी होणार

  • Written By: Published:
Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात मोठा ट्वीस्ट ! आरोपीच्या वयाची चाचणी होणार

NCP Leader Baba Siddique death: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (NCP) व माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची शनिवारी रात्री मुंबईत तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यातील दोघा आरोपींना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केलीय. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यात एका आरोपींने मी सतरा वर्षांचा असून, अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयासमोर केला आहे. तर न्यायालयाने आरोपीचे कागदपत्राची तपासणी करून आरोपीच्या वयाची खात्री करण्याची सूचना पोलिसांना दिलीय. त्यामुळे या आरोपीची वैद्यकीय चाचणी होणार आहे. तोपर्यंत आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. वैद्यकीय चाचणीच्या अहवालानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अजित पवारांनंतर भाजपलाही धक्का, माजी आमदाराचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर काही तासांत मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. गुलमित सिंग आणि धर्मराज कश्यप असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. हे आरोपी हे हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. या आरोपींना रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यातील आरोपी धर्मराज कश्यप याने आपण अल्पवयीन असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कश्यप हा अल्पवयीन असल्याने त्याप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला केली आहे. तर गुन्ह्याचा तपास करत असलेल्या पोलिसांनी आरोपी सज्ञान असून, तो 21 वर्षांचा असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना या आरोपीच्या वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड सादर करण्यास सांगितले आहे.

‘पवारांना फक्त खुर्चीच दिसते’; सिद्दीकींच्या हत्येनंतर राजीनामा मागताच फडणवीसांचा टोला


पुण्यातून आरोपी मुंबईत

सिद्दीकी यांची हत्या करणारे आरोपी हे पुण्यास वास्तव्यास होते. तेथून ते मुंबईत गेल्याचे तपासात समोर येत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून 28 जिवंत काडतुसे होते. त्यामुळे आणखी काही जण आरोपींच्या निशाणावर होते का, या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत.

तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, शोध सुरू

या गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. तिसऱ्या आरोपीची ओळखही पोलिसांनी पटली असून,शिवकुमार गौतम उर्फ शिवा असे त्याचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशचा आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी दहा पथके स्थापन केली आहे. राज्यात आणि राज्याबाहेर शिवा याचा शोध सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube