मोठी बातमी, बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण संशयित आरोपीला नेपाळमधून अटक
Baba Siddiqui : राज्याचे माजी मंत्री बाब सिद्धीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, पोलिसांनी एका संयशित आरोपीला

Baba Siddiqui : राज्याचे माजी मंत्री बाब सिद्धीकी हत्या (Baba Siddiqui) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, पोलिसांनी एका संशयित आरोपीला नेपाळमधून अटक केली आहे. माहितीनुसार, पोलिसांनी बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात नेपाळमधून संशयित आरोपी सलीम शेख उर्फ सलीम पिस्टल याला अटक केली आहे.
12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी काही आरोपींना देखील यापूर्वी अटक केली आहे. तर आता पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळमधून सलीम शेक उर्फ सलीम पिस्टल या संशयित आरोपीला अटक केल्याने या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हत्येपूर्वी बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. मात्र 12 ऑक्टोबर 2024 च्या रात्री माजी आमदार झिशान सिद्धीकी यांच्या ऑफीसच्या बाहेर बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत धर्मराज कश्यप, गुरमैल सिंग, प्रवीण लोणकर आणि मोहम्मद झीशान अख्तर या आरोपींना अटक केली आहे.
टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया संघात बदल; ‘या’ खेळाडूला मोठी जबाबदारी