मोठी बातमी! शूटरने उघड केलं खळबळजनक रहस्य; अनमोल बिश्नोईने बाबा सिद्दिकींची हत्या का केली?

  • Written By: Published:
मोठी बातमी! शूटरने उघड केलं खळबळजनक रहस्य; अनमोल बिश्नोईने बाबा सिद्दिकींची हत्या का केली?

Baba Siddiqui Murder Case : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा कट का रचण्यात आला होता हे शूटरने कबूल केल्याचं समोर आलं आहे. (Baba Siddiqui ) त्याने पोलिसांना गँगस्टर अनमोल बिश्नोईचे नावही सांगितलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी २५ हून अधिक आरोपींना अटक केली आहे. कुख्यात गुन्हेगार अनमोल बिश्नोईने ‘दाऊद इब्राहिमशी संबंध आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग’ यावरून हल्ला करण्याचे आदेश दिले होते. सिद्दीकीवर हल्ला करणारा मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात हे सांगितलं आहे.

Baba Siddiqui : मोठी बातमी! बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात सुरक्षा रक्षक पोलिसाला केलं निलंबीत

माजी मंत्री सिद्दीकी यांच्या १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात गौतमचा कबुलीजबाब समाविष्ट आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व भागात त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकींच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी सिद्दीकीची (६६) गोळ्या घालून हत्या केली. गौतमने असाही दावा केला की त्याला बाबा सिद्दीकी किंवा झीशान सिद्दीकी यांना मारण्यास सांगण्यात आलं होतं आणि त्या बदल्यात १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. त्याने पोलिसांना सांगितलं आहे की तो पुण्यात भंगार गोळा करायचा आणि त्या वस्तू सह-आरोपी हरीश कुमार कश्यपला विकत असे.

त्याचबरोबर रद्दीचे दुकान चालवणाऱ्या कश्यपने त्याच्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि याच काळात त्याची प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकरशी ओळख झाली. गौतमने त्याच्या कबुलीजबाबात म्हटलं आहे की, ‘एके दिवशी शुभम लोणकरने शूटरला सांगितलं की तो आणि त्याचा भाऊ बिश्नोई टोळीसाठी काम करतात. जून २०२४ मध्ये, शुभम लोणकर (शुब्बू) ने मला आणि धर्मराज कश्यप (सह-शूटर) ला सांगितलं की जर आम्ही त्याच्या सूचनेनुसार काम केलं तर आम्हाला १० ते १५ लाख रुपये मिळू शकतात. जेव्हा मी कामाबद्दल विचारले तेव्हा शुभमने आम्हाला सांगितले की आपल्याला बाबा सिद्दीकी किंवा त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांना मारायचं आहे. पण त्याने अधिक माहिती दिली नाही.

फ्लॅट देण्याचे आश्वासन

सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपपत्रात असं म्हटलं आहे की बाबा सिद्दीकींची हत्या अनमोलच्या नेतृत्वाखालील गुन्हेगारी संघटनेने केली होती. आरोपीने अनमोलसोबत झालेल्या संभाषणाबद्दल पोलिसांना सांगितलं आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, संभाषणातील एक उतारा असा आहे की, ‘राम राम बंधूंनो, लॉरेन्स भाईंनी तुम्हा सर्वांना राम राम म्हणण्यास सांगितले आहे. काय चाललंय. तुम्हाला एक काम करावे लागेल, हिंमत ठेवा. जर तुम्हाला वांद्रे येथील घराजवळ रेकी करायची असेल तर त्याच परिसरात घर भाड्याने घ्या. काम पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येकाला एक चारचाकी गाडी आणि एक फ्लॅट मिळेल… त्याआधी मी तुम्हाला ५ लाख रुपये अॅडव्हान्स देईन. मला माझ्या भावाचा बदला घ्यायचा आहे. आपल्याला आपल्या धर्मासाठी जगावे लागेल…’

अहवालानुसार, पोलिसांनी दावा केला आहे की शुभम लोणकर आणि अनमोल यांच्यात स्पीकरवर संभाषण झाले होते आणि त्यावेळी आणखी तीन आरोपी उपस्थित होते. आरोपपत्रात असं म्हटलं आहे की अनमोलने त्याचा सहकारी अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही हत्येची योजना आखली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube