मोठी बातमी! गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेत अटक

  • Written By: Published:
मोठी बातमी! गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेत अटक

Anmol Bishnoi : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) हत्या प्रकरणातील आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol bishnoi) याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, अनमोलला कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आली आहे.

माहितीनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अनमोल त्यांच्या देशात असल्याची माहिती दिली होती.त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठवला होता. आता या प्रस्तावावर कारवाई करत कॅलिफोर्निया पोलिसांनी अनमोलला अटक केली आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणासह काही हाय-प्रोफाइल गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे NIA ने अनमोल बिश्नोईची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर दुसरीकडे 2022 मध्ये एनआयएने दाखल झालेल्या दोन प्रकरणांमध्ये अनमोलविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे. याच बरोबर बॉलिवूड सुपर स्टार सलमान खानच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातही अनमोल बिश्नोईचे नाव पुढे आले होते.

या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांची आरोपी म्हणून नावे ठेवली आहेत. या प्रकरणी अनमोलविरोधात लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी देखील लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांचे नाव पुढे आले आहे.

ख्रिस्ती समाजाचा दिमाखदार मेळावा संपन्न, बापुसाहेब पठारे यांना जाहिर पाठिंबा

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक मोठा म्होरक्याही बिष्णोई टोळीच्या रडारवर होता. अलीकडेच, तिहार तुरुंग प्रशासनाने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर, बिश्नोई टोळीने श्रद्धा वॉकर खून खटल्यातील दोषी आफताब पूनावाला यांना टार्गेट करण्याची योजना आखली होती, त्यानंतर आरोपी आफताबभोवती सुरक्षा वाढवण्यात आली होती

follow us
  • fb
  • instagram
  • youtube