कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार! तिसऱ्यांदा, लॉरेन्स टोळीने सोशल मीडियावर…

कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा एकदा फायरिंगची घटना घडली.

Firing At Comedian Kapil Sharma

Firing At Comedian Kapil Sharma Cafe In Canada : कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा एकदा फायरिंगची घटना घडली. ही तिसरी घटना असून याआधी 10 जुलै आणि 7 ऑगस्ट रोजी देखील त्यांच्या कॅफेवर गोळीबार झाला होता. या तिसऱ्या फायरिंगचा व्हिडिओही समोर आला असून शूटर्स सतत गोळ्या झाडताना दिसत आहेत. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही, मात्र कॅफेच्या खिडक्यांचे काचा तुटल्या आहेत.

लॉरेंस बिश्नोई गँग

सोशल मीडियावर लॉरेंस बिश्नोई गँगशी (Lawrence Gang Firing) संबंधित गोल्डी ढिल्लो आणि कुलदीप सिद्दू नेपाली यांनी या फायरिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. गँगच्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, गोळी कुठूनही येऊ शकते. अवैध काम करणाऱ्यांसह, धर्मविरोधी बोलणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची (Kapil Sharma) चेतावणी दिली आहे. पोस्टमध्ये गँगने आपला उद्देशही स्पष्ट केला की, सामान्य जनता त्यांच्या वादात नाही. फक्त जे त्यांच्या विरोधात आहेत त्यांच्यावर कारवाई होईल.

सुरक्षा उपाय अधिक कडक

कपिल शर्मा यांच्या कॅफेवरील या सततच्या घटनांमुळे (Canada) सुरक्षा उपाय अधिक कडक करण्यात आलेत. प्रत्येक फायरिंगनंतर मुंबईत कपिलच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन करण्यात आलंय. यामुळे कॅफे काही दिवस बंद राहिला आणि त्यानंतर पुन्हा उघडण्यात (Firing At Comedian Kapil Sharma Cafe) आला.

अचानक गोळीबार झाला आणि…

कॅफेवरील पहिली फायरिंग 10 जुलै रोजी झाली होती. त्या दिवशी कॅनडा येथील कपिल शर्मा कॅफेवर अचानक गोळीबार झाला. लगेचच प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेला माहिती देण्यात आली. दुसरी फायरिंग 7 ऑगस्ट रोजी झाली होती, त्यावेळी देखील कोणतीही गंभीर जखम झाली नाही, पण सुरक्षा उपाय अधिक कडक करण्यात आले. आता तिसरी घटना घडल्याने कॅफेच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा सुधारणा केली जात आहे.

सोशल मीडियावर धमकी

याव्यतिरिक्त, गँगने सोशल मीडियावर धमकी दिली की, अवैध काम करणारे लोक आणि जे बॉलीवुडमध्ये धर्माच्या विरोधात बोलतात, त्यांनाही इशारा दिला जाईल. या संदेशामुळे कॅफेवरील घटना आणि सुरक्षा याबाबत प्रशासनात गंभीर चर्चा सुरू आहे. कपिल शर्मा आणि त्यांच्या व्यवस्थापनाने या हिंसक घटनांविरोधात ठाम भूमिका घेतली असून, कॅफेच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरू आहेत. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. कॅफे आणि त्याचे ग्राहक सुरक्षित राहावेत यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.

तिसऱ्या फायरिंगनंतर, कॅफेतील कर्मचाऱ्यांची सुरक्षा, परिसरातील सीसीटीव्ही निरीक्षण, आणि मुंबईतील सुरक्षा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अतिरिक्त सुरक्षा उपाय राबवण्यात येत आहेत. या घटनांमुळे कपिल शर्मा आणि कॅफेच्या व्यवस्थापनाने सार्वजनिक सुरक्षिततेसाठी जागरूकतेची मोहीम सुरू केली आहे.

follow us