Download App

तुम्ही माझ्यासारखा प्रामणिक माणूस गमावला; सुरेश धस असं का म्हणाले?, पंकजा मुंडेंवर का आरोप केले?

सुरेश धस हे अनेक दिवस शांत राहणारे नेते नाहीत अशी त्यांची ओळख आहे. अॅक्शनला रिअॅक्शन अशी त्यांनी मूळ ओळख आहे. 2014 ला सुरेश धस

  • Written By: Last Updated:

Suresh Dhas Vs Pankaja Munde : महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार असले तरी चर्चेत असतात ते काही आमदारचं. त्या काही आमदारांमध्ये अनेकदा चर्चेत येतात ते आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस. त्यांना टोपण नावाने पूर्ण बीड जिल्हा आण्णा या नावाने ओळखतो. तर झालं असं की, सुरेश धस यांनी विधानसभेचा निकाल लागताच झालेल्या विजयी सभेत पंकजा मुंडे यांच्यावर थेट विश्वासघात केल्याचा आरोप केलाय. आपण नुकतीच पार पडलेल्या लोकसभेला जीवाच रान करून पंकजा मुंडे यांना मदत केली. मात्र, त्यांनी विधानसभेला आपल्याला पराभूत करण्यासाठी काम केलं असं (Suresh Dhas )सुरेश धस म्हणालेत. त्याचबरोबर, फक्त पंकजा मुंडेच नाहीत तर माजी खासदार प्रितम मुंडे यांनीही सर्व प्रयत्न केले असाही घणाघात त्यांनी केलाय.

आष्टी पाटोदा शिरुर मतदारसंघात चौरंगी लढत झाली. त्यामधील तिरंगी लढत ही महायुतीमध्येच झाली. सुरेश धस हे भाजपचे उमेदवार होते. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार होते. तर, भाजपचेच अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे अपक्ष रिंगणात होते. या लढतीत सुरेश धस यांनी तब्बल 77 हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवलाय. परंतु, निवडणूक जाहीर झाली तेव्हा या तिघांपैकी कुणाला एकाला तिकीट मिळेल आणि दोघांना माघार घ्यावी लागेल अशी परिस्थिती होती. मात्र, कुणीच माघार घेणार नाही असं एकंदरीत वातावरण होतं. त्याच वातावरणाचा अंदाज घेत सुरेश धस यांनी पक्षाने कुणालाच तिकीट देऊ नये सुट्टा खेळ होऊद्या अशी घोषणा केली होती. पुढे दोघांना तिकीट मिळाले आणि भिमराव धोंडे अपक्ष मैदानात राहीले.

पंकजाताई, तुम्ही असं करायला नको होतं; विजयी होताच सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर थेट घणाघात

भिमराव धोंडे हे ओबीसी आहेत. त्यामुळे त्यांच्यापाठिमागे पंकजा मुंडे राहतील अशी मतदारसंघात दबक्या आवाजात चर्चा होती. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेला आष्टी मतदारसंघातून 32 हाजारांचं लीड होत. त्यामध्ये सिंहाचा वाटा सुरेश धस यांचा असल्याचं तालुक्यात बोललं जातय. परंतु, त्यावर पंकजा मुंडे काही खूश नव्हत्या अशीही चर्चा एका वर्गात होती. आणखी थोड लीड मिळालं असतं तर आपण विजयी झालो असतो असा त्यांचं मत आलं. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटता असल्याने हा फटका बसला असा इथला एकंदरीत निष्कर्ष निघाला तो लोकसभा निवडणुकीनंतर. त्यानंतर हाच धागा पकडून ओबीसी एकगठ्ठा होऊन अन् सुरेश धसांच्या विरोधातील मराठा असं गणित जुळवून भिमराव धोंडे आमदार होतील अशी रणणिती आखली होती. पण तस काही झालं नाही.

सुरेश धस हे अनेक दिवस शांत राहणारे नेते नाहीत अशी त्यांची ओळख आहे. अॅक्शनला रिअॅक्शन अशी त्यांनी मूळ ओळख आहे. 2014 ला सुरेश धस ज्यांच्या तालमीत तयार झाले त्या गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढले होते. त्यामध्ये त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. पुढे दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांचंही निधन झालं. त्यानंतर त्यांच्या कन्या प्रितम मुंडे खासदार झाल्या. पुढे सरेश धस यांचीही राजकीय गणित बदलले आणि त्यांनी पंकजा मुंडे यांना सहकार्य करण्याची भू्मिका घेतली. 2017 पासून धस हे त्यांच्यासोबत आहेत. त्यानंतर सगळ अलबेल असताना अखेर या विधानसभेच्या निवडणुकीत या नेत्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचं सध्याचं चित्र आहे. कारण तुमच्याशी 100 टक्के इमादार राहिलेला एक सच्चा माणूस तुम्ही गमावला असं सुरेश धस आपल्या भाषणात म्हणाले.

त्याचबरोबर मी गोपीनाथ मुंडे यांचा चेला आहे. त्यांनी मला घडवलं. परंतु, दुर्दैवाने त्यांचं लवकर निधन झालं. मात्र, मी सिनीअर आहे असं समजून कधीच वागलो नाही. पंकजा मुंडे यांना 10 वर्ष सिनीअर असताना मी त्यांना नेता माणलं. त्या म्हणतील तसा निर्णय घेतला. सगळे विरोधात असताना आणि मराठा आरक्षणाची मोठी लाट असताना मी हा सगळा रोष पत्करून पंकजा मुंडे यांचं लोकसभेला इमानदारीने काम केलं. मग त्या माझ्या विरोधात कसकाय काम करू शकतात? त्यांनी असं का केलं? मी कधीच जातिपातीच राजकारण केलं नाही. मग मला पाडण्यासाठी पंकजा मुंडे यांनी अनेक कार्यकर्त्यांना फोन करून विरोधी उमेदवाराला मदत करण्यासं का सांगितंल? असा थेट प्रश्न करत पंकजाताई हे बागणं बर नाही अशी खंत सुरेश धस यांनी यावेळी बोलून दाखवली. त्याचवेळी वाघाच्या शेपटावर पाय द्यायला नको होता असंही सुरेश धस यावेळी म्हणालेत. त्यामुळे या सगळ्यां आरोपांवर पंकजा मुंडे काय उत्तर देतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

follow us