Download App

Video : मागच्या वर्षीपासून दसरा मेळाव्याला हलकं वागणारे लोक…, गोंधळ घालणाऱ्यांवर पंकजा मुंडे संतापल्या

आज माझ्यासाठी, माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं हृदयातून स्वागत करते.

  • Written By: Last Updated:

भगवान गडावर आज दसरा मेळावा पार पडतोय. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, (Pankaja Munde) प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आलेत. माझ्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून लोक येतात. झाडावर टॉवर बसलेले लोक स्वत: आले आहेत. मी तुम्हाला आणलं का? तुम्ही स्वत: आला असाल तर तोंडं बंद करा. माझ्या दसऱ्या मेळाव्यात पूर्ण राज्यातून लोक येत आहेत. दरवर्षी येतात. पण मागच्या वर्षीपासून असं हलके वागणारे लोक का येत आहेत असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

तुमची भगवान बाबांवर श्रद्धा आहे. असं धिंगाणा करणारे लोकं माझे असू शकत नाही. आज माझ्यासाठी, माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं हृदयातून स्वागत करते. हा फाटक्या माणसाचा मेळावा आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं. यादरम्यान पंकजा मुंडे यांनी शायरीतून आपल्या भावना व्यक्त करत म्हणाल्या की, विरासत में संघर्ष मिला है, तो जिद भी मिली है लडने की, चाहे जो भी हो, दटकर आगे बढने की, बदलू मै क्यों मै विचारोंकी अटल चोटी हूँ, मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ…, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर दसरा मेळावा अन् संघाची शताब्दी, मोहन भागवतांनी केलं गांधींचं स्मरण

यादरम्यान बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, माझा भगवान गडावरील मेळावा काढून घेतला गेला. कोणाची सुपारी घेऊन आलात माहिती नाही, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले. लोकांचं दुख पाहून वेदना झाल्या. मी शब्दात मांडू शकत नाही. मोदी आणि फडणवीस यांच्यावतीने शब्द देतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत. पूर्ण मदत करणार आहोत. भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला. आता हा मेळावाही तुम्ही हिरावून घेताय असं वाटतं.

तुम्ही शुद्धीवर नाही. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही माझी माणसं नाहीत. गोंधळ घालणाऱ्यांनी कितीही माझ्या नावाच्या घोषणा दिल्या तरी तुम्ही पवित्र होणार नाही. कारण अशी बेशिस्त मी यापूर्वी मेळाव्यात पाहिली नव्हती,असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. दसरा मेळाव्याची सुरूवात झाली तेव्हा प्रचंड गोंधल उपस्थितांनी घातल्याने पंकजा मुंडे वैतागल्याचं तेथे पाहायला मिळालं. धनंजय मुंडे बोलतानाही अनेक लोक गोंधळ करत होती. धनंजय मुंडे यांनी संतापून बोलू देण्यासाठी आलात की बंद करण्यासाठी असा सवाल करत मला चांगल आणि वाईटही समजावता येत असंही ते म्हणाले.

follow us