Download App

खोडावर घाव घालायचं सोडा तुम्ही पाल्यालाही हाता लावू शकत नाही, भाजप उमेदवार सुरेश धस कडाडले

पश्छिम वाहिण्यांच जे जायकवाडीत पाणी जात ते आपल्याकडे आणण्याचं काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. तसंच, सिना व सिंदफणा या

  • Written By: Last Updated:

Suresh Dhas Sabha : महायुती सरकारने महिलांना बस प्रवास सुविधांसह महिन्याला दीड हजार रुपये देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणात स्वालंबी झाल्या आहेत. (Suresh Dhas) त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी बी-बीयान पाटप करण्याचाही सरकाराने मोठ काम केलं आहे. त्यामुळे यावेळी अनेक ठिकाणी लोकांचा महायुती सरकारला पाठिंबा आहे असा विश्वास आष्टी पाटोदा शिरुर मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केला. ते कडा येथे प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आमदार पंकजा मुंडेही उपस्थित होत्या.

पश्छिम वाहिण्यांच जे जायकवाडीत पाणी जात ते आपल्याकडे आणण्याचं काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. तसंच, सिना व सिंदफणा या नदीवर बॅरिजस बांधण्याचं काम मी करणार असं आश्वासनही सुरेश धस यांनी यावेळी उपस्थितांना दिलं आहे. तसंच, भायाळा येथील तलावाची उंची वाढवण्याच कामही मी करणार आहे असंही सुरेश धस यावेळी म्हणाले आहेत. यावेळी उपस्थितांनी मोठा जल्लोश येथे केल्याचं पाहायला मिळालं.

Assembly Election 2024 : बीडमध्ये पवारांचे गणित चुकलंय; हक्काच्या जागा जाणार?

पुढं बोलताना सुरेश धस म्हणाले, 2014 ला अनेक लोकांनी एक मत प्रितम मुंडे यांना केलं आणि दुसरं मला करण्याचं ठरवलं होतं. परंतु, काही ठिकाणी गद्दारी झाली त्यामुळे आमचा पराभव झाला. 2014 ला लोकांनी आम्हाला बुक्का लावला. परंतु, आता पुन्हा काही बुक्का लावू नका. आता तरी गुलाल लावा अशी मिश्कील टिप्पणी यावेळी सुरेश धस यांनी केली. तसंच, गुलाल लावणार का? का यावेळीही बुक्का लावणार असंही धस यावेळी म्हणाले.

उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे म्हणाले होते, मी खोडावर घालीन. परंतु, तुम्हाला सांगतो, तुम्ही पाल्यालाही हात लावू शकत नाहीत. त्याबाबत आमचा नाद करायचा नाही. तसंच, देवस्थानच्या जमिनी आम्ही नाही तुम्ही रामाची जमीन खाताय असा थेट आरोप सुरेश धस यांनी केला. त्याचबरोबर तुम्ही आजचा शेवटचा दिवस आहे काय आवरायचय ते आवरून घ्या. संध्याकाळपर्यंत सगळच आवरून घेतो असा थेट घणाघात त्यांनी यावेळी केला.

माझ्या विरोधातील उमेदवारांनी अनेक ठिकाणी नकारात्मक प्रचार केला. परंतु, ही जनता समजदार आहे. त्यामुळे मी कुठ तलाव केले, कोणत्या तलावात पाणी आणण्याचं काम केलं. तसंच, कुंठेफर धरणात काही जे राहीलेलं पाणी आहे ते आणण्याचंही काम मी करणार आहे असं आश्वासनही सुरेश धस यांनी यावेळी दिलं आहे.

follow us