Nitish Kumar : जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज अखेर (Nitish Kumar) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आरजेडी आणि काँग्रेसला (Congress) धक्का दिला. नितीश कुमार आजच भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांच्या याच खेळीची चर्चा सुरू आहे. मात्र आणखीही एक किस्सा चर्चेत (Bihar Politics) आला आहे. तो म्हणजे, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांना फोन केला होता. पीएम मोदींनी नितीश कुमार यांना शुभेच्छाही दिल्या.
नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत 2022 पासून सुरू असलेल्या जेडीयू,आरजेडी, काँग्रेस आघाडीला ब्रेक लावला. पीएम मोदींबरोबर फोनवर चर्चा झाल्यानंतर नितीश कुमार थेट राजभवनात पोहोचले आणि राजीनामा दिला.
Nitish Kumar यांची पहिलीच वेळ नाही; 1974 पासून कधी आरजेडी कधी भाजप तळ्यात-मळ्यात सुरूच
यानंतर पीएम मोदी यांच्याबरोबर नितीश कुमार यांचेही बॅनर पटना शहरात लावले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री निवासस्थानी जेडीयू आमदारांची बैठक झाली. या बैठकीत नितीश कुमार यांना निर्णय घेण्यासाठी अधिकार देण्यात आले. यानंतर त्यांनी महाआघाडीच्या सरकारमधून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ही बैठक सुरू असतानाच नितीश कुमार यांना थेट पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याची माहिती आहे. यावेळी दोघांत चर्चा झाली यानंतर पंतप्रधान मोदींनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
26 जानेवारीलाच मिळाला होता इशारा
26 जानेवारी रोजी राजभवनात चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार ज्या पद्धतीने हसून चर्चा करत होते त्यावरून बरेच काही स्पष्ट झाले होते. शनिवारी नितीश कुमार बक्सर दौऱ्यावर होते. येथे केंद्रीय मंत्री अश्विनी कु्मार चौबे यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. दोघांनीही येथे धार्मिक कार्यक्रमात पूजा केली. यानंतरही नितीश कुमार यांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज येत होता.
Nitish Kumar : नितीश कुमारांनी राजीनामा का दिला? स्वतःच केला धक्कादायक खुलासा
राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आघाडीत काहीही चांगले घडत नव्हते. आम्ही इंडिया (Bihar News) आघाडीत काम करत होतो. सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतो परंतु बाकीचे पक्ष काम करत नव्हते. आघाडीची परिस्थितीही चांगली नव्हती. त्यामुळे मला राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
आज मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आम्ही सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. कारण सरकार व्यवस्थित चालत नव्हते. आमचा घटक पक्षांशी संवाद देखील बंद झाला होता. यानंतर आम्ही सर्वांची मते जाणून घेतली. त्यानंतर या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही नव्या युतीची घोषणा केली आहे. दीड वर्षांपू्र्वी आघाडी केली होती. परंतु, परिस्थिती चांगली नव्हती. म्हणून राजीनामा द्यावा लागला, असे नितीश कुमार म्हणाले.