Physiotherapists not entitled to use doctor : आरोग्य विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य सेवा महानिदेशकांनी (DGHS) काही दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार आता फिजियोथेरपिस्ट या आरोग्य सेवा व्यावसायिकांना आता स्वतःला डॉक्टर म्हणवून घेता येणार नाही. त्यांना तसा अधिकारच नाही फक्त रजिस्टर्ड डॉक्टर्सनाच हा अधिकार आहे असे महानिदेशकांनी स्पष्ट केले आहे. डीजीएचएसच्या डॉ. सुनीता शर्मा यांनी यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली यांना लिहिलेल्या पत्रात याबाबतीत उल्लेख केला आहे.
या पत्रात म्हटले आहे की फिजियोथेरपिस्ट लोकांनी त्यांच्या नावाचे पुढे ‘डॉ’ आणि नावाच्या मागे ‘पीटी’ लावल्याच्या (Physiotherapist News) तक्रारी मिळाल्या आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन (आयएपीएमआर) सहीत विविध संघटनांनी या तक्रारी केल्या आहेत. निवेदने दिली आहेत. त्यामुळे याबाबतीत काही सूचना केल्या आहेत.
एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांसाठी गुडन्यूज; CCMP कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची MMC मध्ये होणार नोंद
आयएपीएमआरने कळवले आहे की ही समस्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सहयोगी आणि आरोग्य सेवा व्यवसाय आयोग (NCAHP) द्वारे 23 मार्च रोजी प्रकाशित झालेल्या फिजियोथेरपीसाठी मंजूर केलेल्या क्षमता आधारीत अभ्यासक्रमातून उद्भवली आहे. म्हणूनच फिजियोथेरपिस्टच्या नावाआधी डॉक्टर आणि त्यानंतर पीटी असा शब्द वापरण्याची शिफारस केली जाते असे या पत्रात म्हटले आहे.
फिजियोथेरपिस्ट हे वैद्यकीय डॉक्टर म्हणून प्रशिक्षित नसतात. त्यांनी त्यांच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावू नये असे डॉ. शर्मा यांनी पत्रात म्हटले आहे. अशा गोष्टींमुळे लोकांची दिशाभूल होऊ शकते. बनावटगिरीलाही प्रोत्साहन मिळू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. फिजियोथेरपिस्टना प्राथमिक काळजी घेण्याची परवानगी देऊ नये, त्यांनी फक्त रेफर केलेल्या रुग्णांवरच उपचार करावेत कारण त्यांना वैद्यकीय स्थितीचे निदान करण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून चुकीचे निदान होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
सणासुदीच्या काळात हृदयाकडे दुर्लक्ष नकाे! हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी काय कराल, डॉक्टर सांगतात…