Download App

मोठी बातमी : लोकसभा अध्यक्षपदी ओमप्रकाश बिर्लांची पुन्हा निवड; ‘इंडिया’ आघाडीची खेळी फेल

लोकसभा अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला विजयी झाले.

Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदासाठी आज देशाच्या इतिहासात  (Lok Sabha Speaker Election) पहिल्यांदाच निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीए आघाडीचे (NDA Government) उमेदवार ओम बिर्ला यांनी इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) उमेदवार के. सुरेश यांचा (K. Suresh) पराभव केला. अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाही अशी अपेक्षा होती. परंतु, विरोधकांनी उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. या मागणीवर मात्र सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले नाही. त्यामुळे इंडिया आघाडीने या निवडणुकीसाठी के. सुरेश यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घ्यावी लागली.

या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे ओम बिर्ला यांनी (Om Birla) बाजी मारली. केरळमधील वायनाडची जागा रिक्त होती. सात जणांनी अद्याप शपथ घेतली नाही. त्यामुळे या निवडणुकीत 535 खासदार मत देण्यास पात्र होते.  उमेदवाराला निवडून येण्यासाठी 267 बहुमताचा आकडा गाठायचा होता. त्यानुसार एनडीए आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला यांनी बाजी मारली. संसदेत आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. राजनाथ सिंह यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. यानंतर आवाजी मतदान होऊन ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे प्रोटेम स्पीकर भर्तुहरी महताब यांनी जाहीर केले.


आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांच्या संमतीने स्पीकर नियुक्त केला जात होता. पण यंदा ही परंपरा मोडीत निघाली आहे. याआधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी चर्चा केली होती. राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) सांगितले होते की विरोधक अध्यक्षपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास तयार आहेत मात्र उपाध्यक्षपद विरोधकांना मिळालं पाहिजे. या अटीवर राजनाथ सिंह यांनी काहीच उत्तर दिलं नाही.

राजनाथ सिंह यांनी (Rajnath Singh) काल सांगितलं होतं की तुम्ही आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या. यानंतर सगळ्याच विरोधी पक्षांनी सांगितलं होतं की उपाध्यक्ष पद मिळालं तरच पाठिंबा देऊ. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पीएम मोदी म्हणतात सहकार्य करा. पण आमच्या नेत्यांचा अपमान केला जात आहे. सरकारचा हेतू स्वच्छ नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली. काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी राजनाथ सिंह यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली तेव्हा खर्गे उपस्थित होते. त्यावेळी अध्यक्षपदासाठी कोणतेही नाव सुचवण्यात आले नव्हते.

सर्वसंमतीनेच अध्यक्ष निवडीचा इतिहास

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा गणेश वासुदेव मावळकर यांची निवड झाली होती. त्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वसंमतीने अध्यक्ष निवडले गेले आहेत. बाराव्या लोकसभेचं अध्यक्षपद टीडीपीच्या जीएमसी बालयोगी यांना देण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यानंतरच्या तेराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून बालयोगी यांनाच नियुक्त करण्यात आले होते. परंतु, अध्यक्षपदावर असतानाच हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी यांना अध्यक्ष करण्यात आले होते.

follow us