Download App

खोट्या मतदारांना चोपणारच, भाजप काय आमचा बाप नाही; मनसेचं भाजपला चॅलेंज

Avinash Jadhav यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राहुल गांधींचं समर्थन करत भाजपवर मतचोरीचे आरोप केले.

  • Written By: Last Updated:

Avinash Jadhav Exclusive on BJP and Rahul Gandhi Votechori : मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लेट्सअप मराठीच्या चर्चा या कार्यक्रमामध्ये मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यामध्ये त्यांना राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी ही मतांमध्ये का परिवर्तित होत नाही? असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी राहुल गांधींचं समर्थन करत भाजपवर मतचोरीचे आरोप केले.

राज ठाकरेंची मैत्रीची दारं खुली…

अविनाश जाधव यांना राज ठाकरेंना वारंवार भेटायला येणाऱ्या भाजप नेत्यांबाबत विचारले असता. ते म्हणाले की, राज ठाकरेंची मैत्रीची दारं खुली असतात. त्यांना जे-जे नेते भेटायला येतात तेव्हा आम्ही माहिती पत्रकारांना देत नाही. ते वेगळ्या विषयावर भेट घेण्यासाठी आलेले असतात. मात्र ते माध्यमांशी वेगळ सांगतात. असंच चंद्रकांत पाटील यांनी देखील राज ठाकरेंना भेटीला आल्यानंतर माध्यमांना हात दाखवून वेगळा इशारा केला होता.

भयंकर! बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या, छातीत वार करत क्रूरपणे संपवलं…

तसेच ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. अशीच भूमिका त्यांनी परवा झालेल्या भारत पाकिस्तानच्या सामन्यावरून त्यांनी घेतली होती. जनतेच्या मनातील होती की, सामना होऊ नये. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांच्या भावना त्यांनी महत्त्वाच्या मानल्या. त्यामुळे जेव्हा-जेव्हा देश आणि राज्यात चुकीचं काही घडत त्याविरूद्ध ते भूमिका घेतात.

भाजपकडून होतेय फसवणूक…

तर इगतपुरीच्या मेळाव्यामध्ये पक्षातील नेत्यांनी राज ठाकरेंसमोर आपल्या भूमिका मांडल्या. त्यामध्ये भाजपकडून होत असलेली फसवणूक, तसेच नाराजी व्यक्त केली गेली. तसेच हिंदीसक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर आम्ही पेढे वाटले.पण मीरा भाईंदरच्या एका व्यापाऱ्याने त्यांची भाषा हिंदीच असल्याचा पवित्रा घेतल्याने त्याला समज दिली गेली. पण त्याचा काही भाग कट केलेला व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याने व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची चूकीची माहिती पसरवली गेली. तसेच मराठी माणसांविरूद्ध काढल्या गेलेल्या मोर्चाला परवानगी मिळाली. मात्र मनसेने हिंदीविरूद्ध घेतलेल्या भूमिकेच्या आंदोलनाला परवानगी न देता कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

भाजप काय आमचा बाप नाही…

तसेच मनसेच्या आणि राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी ही मतांमध्ये का परिवर्तित होत नाही? असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, त्याचं उत्तर राहुल गांधी यांनी बाहेर काढलेल्या मतचोरीच्या डेटामधून समोर आलेलं आहे. ती मतं ईव्हीएम,मोदी आणि मतचोरी यामुळेच मिळत नाहीत. कारण आम्ही जसं काम करतो. त्याच्या आपेक्षेपेक्षा मिळणाऱ्या मतांचा आकडा विचित्र आहे. कारण बाहेरील मतदार मतदान करतात. हे मतदार याद्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येत.

सिद्धूच्या शायरीवर भाळली मलाइका, अजब-गजब शायरीवर लिहिणार पुस्तक!

त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ही काळजी घेणार आहोत. एकतर मत द्या नाही तर लाथ घ्या अशी आमची भूमिका असणार आहे. खोटं मतदान करणाऱ्यांना आम्ही चोपणारच. या मतदान केंद्रावर वाट बघतोय आम्ही तुमची यावेळी मतदार केंद्रावर आमची पोरं पुर्ण मतदार याद्या घेऊनच आमची पोर बसतील. तसेच यामध्ये ज्याला कुणाला यायचं त्याने यावं भाजप काय आमचा बाप नाही. मेहनत करणाऱ्यांना खोटे मतदार आणावे हे लोकशाहीच्या कोणत्या कलमामध्ये हे बसतं. असा सवाल जाधव यांनी यावेळी भाजपला केला.

 

follow us