सिद्धूच्या शायरीवर भाळली मलाइका, अजब-गजब शायरीवर लिहिणार पुस्तक!
Malaika Arora नवज्योत सिंह सिद्धू आणि शान हे इंडियाज गॉट टॅलेंटच्या मंचावर एकत्र आले आहेत. त्यावेळी मलाईका सिद्धूच्या शायरीवर भाळल्याचं दिसून आलं.

Malaika Arora will write book on Navjot Singh Sidhus shayri from Indias Got Talent : इंडियाज गॉट टॅलेंटचा नवीन, बहुप्रतीक्षित सीझन लवकरच सुरू होत आहे आणि हा मंच उत्साहाने सळसळू लागला आहे. कारण प्रेक्षकांसमोर प्रतिभा, ग्लॅमर आणि मनोरंजन घेऊन येण्यासाठी नवज्योत सिंह सिद्धू, मलाइका अरोरा आणि शान एकत्र आले आहेत.
Exclusive : 11 वर्ष पदं भोगली, सगळं खेचून आणलेलं श्रेय! एकनाथ शिंदेंवर मनसे नेत्याचा हल्लाबोल
एकीकडे, भारतातील काही अजब प्रतिभावंत मंचावर गजब क्षण उभे करत आहेत, तर सिद्धू आपल्या आकर्षक शीघ्र शायरीने त्याला प्रतिसाद देत त्यावर मस्तीचा एक अनोखा तडका देत आहे. आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने स्पर्धक चकित करत आहेत तर सिद्धू आपल्या मस्त, काव्यात्मक ढंगाने तो क्षण अधिक संस्मरणीय करत आहे. त्याच्या शायरीचा अविरत प्रवाह पाहून सगळ्यांना आश्चर्य तर वाटतेच, पण मलाइका त्याने फारच प्रभावित झाली आहे. ती इतकी प्रभावित झाली आहे की, सिद्धूच्या शायरीने प्रेरित होऊन एखादे पुस्तक लिहावे असे तिला वाटू लागले आहे.
परवा बीडमध्ये जे बोललो… ‘त्या’ विधानावर अजित पवारांचं स्पष्टीकरण
अशाच एका क्षणी जेव्हा सिद्धूने एका परफॉर्मन्सचा प्रतिसाद आपल्या शायरीने दिला, तेव्हा मलाइका न राहवून म्हणाली, “सारे जो आप बोल रहे हो ना, मुझे लिखना है.” या शोच्या प्रोमोमध्ये सिद्धू म्हणतो, “दुनिया में सबसे बडा रोग, मेरे बारे में क्या कहेंगे लोग”. या उद्गारांमधून समाजाच्या भीडेखातर मागे राहणाऱ्या प्रतिभावंतांचा संघर्ष दिसतो.
मोठी बातमी! मोबाईल सबमिशनपासून मतमोजणीपर्यंत 30 बदल; निवडणूक आयोगाची नवी गाईडलाईन
हा शो अशा प्रतिभावान लोकांना समाजाच्या भीडेची बंधनं झुगारून निर्भीडपणे आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी उद्युक्त करतो. इंडियाज गॉट टॅलेंटच्या पहिल्या प्रोमोमध्ये तर कार्यक्रमात काय बघायला मिळणार आहे, याची केवळ एक झलक दाखवली आहे आणि “जो अजब है, वो गजब है” या टॅगलाइनने या सीझनची भावना अचूकपणे टिपली आहे.‘इंडियाज गॉट टॅलेंट’ सुरू होत आहे, 4 ऑक्टोबर 2025 रोजी आणि दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर