मलायकाच्या वडिलांचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला; मृत्यूचं धक्कादायक कारण समोर..
Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) वडिल अनिल मेहतांच्या (Anil Mehta Death) मृ्त्यूने चित्रपटसृष्टीला हादरवून टाकलं आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता घराच्या बाल्कनीतून त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केली असे सांगितले जात असले तरी सत्य काय आहे याची माहिती पोलीस तपासातूनच समोर येईल. अनिल मेहता आजारी होते तसेच तणावग्रस्त होते असे आता सांगितले जात आहे. अनिल मेहता मृत्यूआधी दोन्ही मुली मलायका आणि अमृता यांच्याबरोबर बोलले होते.
यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अनिल मेहता यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता. याबाबतच आता मोठी माहिती मिळाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? यामागे काय कारण होते? याचा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार शरीरावर अनेक जखमा (दुखापत) झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा. बुधवारी रात्री आठ वाजता मुंबईतील कूपर पोस्टमार्टम केंद्रात अनिल मेहता यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; कलाविश्वात खळबळ
बुधवारी दुपारी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून अनिल मेहता यांचा मृत्यू झाला होता. मेहतांनी आत्महत्या केली असेच सुरुवातीला सांगितले जात होते. आता त्यांनी आत्महत्या केली की खरंच त्यांचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला याची माहिती पोलीस तपासातूनच मिळेल. परंतु, पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचं कारण दुखापत असल्याचं म्हटलं आहे. आज त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहतील.
घटनास्थळाची संपूर्ण तपासणी केली जात आहे. सध्या आजूबाजूच्या लोकांचे स्टेटमेंट अधिकृतपणे रेकॉर्ड केले जाणार आहेत आणि या प्रकरणाचा कसून तपास केला जाणार आहे. काल पोलिसांनी या प्रकरणात फारशी माहिती दिलेली नव्हती, आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनिल मेहता यांचा मृत्यू दुखापत झाल्याने झाला असावा असा कयास बांधण्यात आला आहे. जर या रिपोर्टवर विश्वास ठेऊन खरंच जर दुखापतीनेच त्यांचा मृत्यू झाला असेल तर ही दुखापत नेमकी कशाने झाली, यांसह अन्य महत्वाचे प्रश्न अनुत्तरीत आहेत. पोलिसांच्या तपासातूनच या सर्व गोष्टींचा उलगडा होऊ शकेल.
मलायकाच्या पालकांचा घटस्फोट…
अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे आई-वडील वेगळे झाले तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. ‘माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. मागे वळून पाहताना, मला ते गोंधळात टाकणारे आढळले, परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्त्वाचे धडे शिकवतात, असे तिने या मुलाखतीत मलायका अरोराने सांगितले होते.