Divorce Credit Score Impact : मानसिक ताण देणारी आणि खर्चिक प्रक्रिया म्हणजे घटस्फोट ही एक आहे. (Impact) अनेकदा घटस्फोटाच्या वेळी लोक संपत्तीचे वाटप, मुलांचे पालकत्व यावर अधिक लक्ष केंद्रित करतात, पण एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे घटस्फोटाचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर होणारा परिणाम.
काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय
घटस्फोट थेट तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करत नाही, मात्र त्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक बदलांचा तुमच्या क्रेडिट वर्थीनेसवर (क्रेडिट घेण्याच्या क्षमतेवर) परिणाम होऊ शकतो. या संभाव्य धोक्यांविषयी माहिती असणे गरजेचे आहे. तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये घटस्फोटाची नोंद होत नसली तरी, त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी अप्रत्यक्षपणे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करू शकतात:
घटस्फोटाचा क्रेडिट स्कोअरवर कसा परिणाम होतो?
1. संयुक्त खात्यांवरील हफ्ते:
घटस्फोटाच्या प्रक्रियेत, विशेषतः जबाबदाऱ्या कोण घेणार याबाबत स्पष्टता नसताना, अनेकदा बिलं भरली जात नाहीत. क्रेडिट कार्ड, गृहकर्ज किंवा इतर संयुक्त कर्जांवरील उशिरा भरलेले किंवा चुकलेले हफ्ते तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करु करतात.
2. संयुक्त कर्जासाठी जबाबदारी:
घटस्फोटाच्या करारात कर्जांची विभागणी केली जाते, पण कर्जदार (बँका) मात्र त्या कराराला बांधील नसतात. जर कोर्टाने तुमच्या माजी जोडीदारावर एखादं कर्ज फेडण्याची जबाबदारी दिली असेल आणि त्यांनी ते न भरल्यास, बँक दोघांकडून वसुली करू शकते. परिणामी, तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर डिफॉल्टची नोंद होऊ शकते.
3. वाढलेला कर्जाचा बोजा:
घटस्फोटानंतर स्वतंत्र घर, वकीलांची फी आणि वाढलेले खर्च यामुळे कर्ज घेण्याची गरज वाढते. त्यामुळे जर तुम्ही जास्त क्रेडिट वापरू लागलात, तर तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढेल आणि स्कोअर कमी होऊ शकतो.
4. उत्पन्नातील बदल:
घटस्फोटामुळे मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते किंवा काही वेळा अॅल्युमिनीवर अवलंबून राहावे लागते. यामुळे खर्च भागवणे कठीण होते आणि कर्जाची परतफेड वेळेवर न करता आल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.
5. संयुक्त खाती बंद करणे:
घटस्फोटानंतर अनेकदा लोक जुनी संयुक्त खाती बंद करतात. ही खाती बंद केल्याने तुमचा एकूण उपलब्ध क्रेडिटही घटतो. यामुळे स्कोअर थोडासा खाली जाऊ शकतो.
घटस्फोट हे आयुष्यातील एक मोठं वळण आहे. या बदलांमध्ये क्रेडिट स्कोअरवर दुर्लक्ष होऊ नये. घटस्फोटामुळे क्रेडिट स्कोअर थेट घसरत नाही, पण परिणामी आर्थिक बदल आणि जबाबदाऱ्या यांचा परिणाम होऊ शकतो. योग्य नियोजन आणि नियमित क्रेडिट मॉनिटरिंग यामुळे तुम्ही तुमचं आर्थिक गणित चांगलं करु शकता.
घटस्फोटाच्या काळात आणि नंतर क्रेडिट कसं सुरक्षित ठेवाल?
1. आर्थिक व्यवहार लवकर स्वतंत्र करा:
संयुक्त खाती शक्य असेल तेव्हा बंद करा किंवा ती केवळ तुमच्या नावावर वळवून घ्या. नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डेही तुमच्या नावावरच घ्या.
2. क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा:
Experian, Equifax आणि TransUnion या तिन्ही क्रेडिट ब्युरोंकडून तुमचा रिपोर्ट नियमितपणे तपासा. यामुळे एखादं चुकलेलं पेमेंट किंवा फसवणुकीचा प्रकार लवकर समजतो.
3. नवीन आर्थिक योजना तयार करा:
घटस्फोटानंतर तुमच्या नवीन परिस्थितीनुसार बजेट तयार करा. तुमचं उत्पन्न, खर्च यांचा विचार करून किमान कर्जहप्ते वेळेवर भरण्यावर प्राधान्य द्या.
4. संयुक्त कर्जाची फेड:
गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज हे एकाच व्यक्तीच्या नावावर करा किंवा माजी जोडीदारासोबत मिळून ती रक्कम पूर्ण फेडून टाका.
5. स्पष्ट संवाद ठेवा:
आर्थिक बाबतीत तुमच्या माजी जोडीदारासोबत चांगला संवाद ठेवा. त्यामुळे गैरसमज टाळता येतात, आणि दोघांच्याही क्रेडिट स्कोअरचं नुकसान टाळता येतं.