Download App

काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय

48 Tourist Spots Closed In Kashmir Due To Security Reasons : जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव काही रिसॉर्ट्स आणि अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक दहशतवादी हल्ला (Pahalgam Attack) झाला होता, ज्यामध्ये 26 पर्यटक मारले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय (Kashmir Tourist Spots) घेण्यात आला आहे. खोल दऱ्या आणि उंच पर्वतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागातील सुमारे 48 रिसॉर्ट्स बंद करण्यात आले आहेत. दूधपत्री आणि वेरीनाग सारखी अनेक पर्यटन स्थळे आता पर्यटकांसाठी बंद आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर सरकारने सुरक्षा एजन्सींच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतला आहे. गुप्तचर संस्थांनी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यतेबद्दल इशारा दिला होता, त्यामुळे 87 पैकी 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर काही लपलेले दहशतवादी खोऱ्यात सक्रिय झाले आहेत. त्यांना हल्ला करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.

चीनमध्ये मोठी दुर्घटना! लिओनिंग रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, 22 जणांचा जळून कोळसा

गुप्तचर माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची घरे उडवून दिल्याचा बदला घेण्यासाठी टीआरटी (द रेझिस्टन्स फ्रंट) संघटना मोठा हल्ला करण्याची योजना आखत आहे. या कारणास्तव, गुलमर्ग, सोनमर्ग आणि दाल लेक सारख्या संवेदनशील पर्यटन स्थळांवर विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. पर्यटकांसाठी प्रतिबंधित ठिकाणांमध्ये दुष्पात्री, कोकरनाग, दुक्सुम, सिंथन टॉप, अच्छाबल, बंगस व्हॅली, मॉर्गन टॉप आणि तोसामैदान यांचा समावेश आहे.

टीआरटीने हल्ला केल्यास याचा परिणाम काश्मीरच्या प्रत्येक क्षेत्रावर होऊ शकतो, परंतु पर्यटनाचे सर्वाधिक नुकसान होऊ शकते. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर थोडीशी सावरणारी काश्मीरची अर्थव्यवस्था पुन्हा कमकुवत होऊ शकते. याशिवाय, काश्मीरमधील लोकांच्या उत्पन्नावर देखील त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीर खोऱ्यातील अनेक पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. सध्या हे पर्यटकांसाठी बंद आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने केली मोठी चूक; अमेरिकेतून मिळाला अलर्ट

या पर्यटक थांब्यांबाबत अधिकाऱ्यांकडून कोणताही औपचारिक आदेश जारी केलेला नाही. सध्या तरी या ठिकाणी पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण काश्मीरमधील अनेक मुघल बागांच्या बाबतीत, ही ठिकाणे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. ही पर्यटन स्थळे बंद केल्याने तेथील पर्यटन क्षेत्रावर परिणाम होईल.

 

follow us