रात्री अडीचला दचकून उठले, समोर रायफलवाला…आठवडा उलटला तरी जगदाळे कुटुंब धक्क्यातच

रात्री अडीचला दचकून उठले, समोर रायफलवाला…आठवडा उलटला तरी जगदाळे कुटुंब धक्क्यातच

Santosh Jagdale Daughter Will Get Government Job : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. सोबतच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची हमीदेखील राज्य सरकार (Pune News) घेत आहे. या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मुलीला राज्य सरकार शासकीय नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. यावर पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरीने म्हटलंय की, सरकारच्या (Fadnavis Cabinet Decision) मदतीमुळे आधार मिळत आहे.

घटनेने मी अन् आई खूप घाबरलेलो आहोत. थोडा पण आवाज झाला तरी लगेच दचकून जागे होतो. त्यामुळे आम्हाला पंधरा दिवस सिक्युरिटी मिळाली तर बरं होईल, असं देखील संतोष जगदाळे यांच्या मुलीने म्हटलं आहे. घरातून बाहेर आम्ही जावू शकत नाही. अनेकजण घरी येतात, त्यामुळे भीती वाटते. आपल्यातीलच आहेत का, बाहेरचं आहे कोणी? असं वाटतंय.

जिथे माझ्यामुळे लोकांना मदत होईल, अशाच ठिकाणी मला नोकरी मिळावी. जी घटना माझ्यासोबत घडली, तेव्हा माझ्या आजुबाजूला अनेक लोकं होती. मी त्यांची काळजी घेतली. माझ्या वडिलांची इच्छा होती, की माणुसकी जगावी. माझ्या शिक्षणानुसार एखादी चांगलीच नोकरी मला मिळावी.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने केली मोठी चूक; अमेरिकेतून मिळाला अलर्ट

अजून आम्ही त्या धक्क्यातच आहोत. डोळे बंद केले की, मला तो रायफलवाला माणूसच दिसतो. मी आठ दिवस झोपलेलेच नाही. लोकांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. आम्ही अजूनही फायरिंगच्या तिथेच आहोत. सारखं तेच तेच रिपीट होतंय. बाहेर पडलेलोच नाहीये. आमचं झालेलं नुकसान कोणीच भरून नाही काढू शकत नाही. मला भयंकर भीती वाटतेय. रात्री अडीचला दचकून उठले, असं वाटलं रायफल घेवून फिरत आहे. ही आमच्या मनाची स्थिती आहे, असं संतोष जगदाळे यांच्या पत्नीने म्हटलंय.

फडणवीसांचा मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख अन् नोकरी देणार

आमचा माणूस त्यांनी आमच्या डोळ्यादेखत मारलाय. त्यामुळे राजकारणी लोकांनी वक्तव्य करताना जपून करावी. याला वेगवेगळा रंग देवू नये, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ते निवांत मारायलाच आले होते. ते पाहिलेलं आमच्या मनात असून अत्यंत भयानक आहे. दहशतवाद हा शब्द आम्ही तिथे अनुभवला आहे. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी कशा गोळ्या घातल्या अन् त्यांचा मेंदू कसा बाहेर आला, हे डोळ्यासमोर आहे. आमच्या भावनांशी खेळू नका, अशी विनंती त्यांनी राजकारणी नेत्यांना केली आहे.

आम्ही सगळे कोणत्या मानसिकतेतून जातोय, याचा विचार केला जावा. समाज, जात, धर्म या सगळ्यांना माणूस म्हणून जास्त महत्त्व दिलं जावं, असं देखील आसावरीने म्हटलंय. सगळ्यांनी एकत्र येवून काहीतरी करा, मुळापासून दहशतवाद संपवा, अशी मागणी देखील आसावरीने केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube