माझे वडील कुटुंबाचा एकमेव आधार, माझ्या समोरच त्यांना…; आसावरी जगदाळेंनी सांगितला थरार

Pahalgam attack : पहलगाममध्ये (Pahalgam attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आज गणबोटे आणि जगदाळे यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जगदाळे यांच्या मुलगी आसावरी जगदाळेंनी (Aasavari Jagdale) हल्ल्याचा धक्कादायक थरार सांगितला.
मोदी सरकारचा मोठा निर्णय अन् सीमा हैदरही भारत सोडणार ? वकिलाने स्पष्टच सांगितलं
आसावरी जगदाळे म्हणाल्या, आम्ही ३० मिनिटे चढून वर गेलो. ते ठिकाण फार सुंदर आहे. आम्ही फोटो काढत असताना अचानक गोळीबार सुरू झाला होता. लोक पळू लागली. आम्ही टेंटमध्ये लपलो होतो. गणबोटे काका खाली झोपले होते, बरेच लोक टेंटमध्ये लपली होती. अनेकांवर फायरिंग झाली. माझ्या वडिलाना तीन गोळ्या लागल्या. माझे वडील जागेवर पडले होते. काकांना देखील दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यांनी फक्त पुरुषांना मारलं. आम्ही तिथून पळून गेलो. तिथल्या एका स्थानिक व्यक्तीने आम्हाला मदत केली. सगळ्या स्थानिकांनी भरपूर मदत केली.
कधी विमानात बसले नाहीत, त्यांना विमानात परत आणलं; शिंदेंच्या खासदाराचं वादग्रस्त विधान
पुढं जगदाळे म्हणाल्या, मला तिथं चक्कर आली होती. सैन्य तिथे पोहोचले होते. सर्व जखमींना श्रीनगर येथे हलवण्यात आलं होतं. रात्री १२ वाजता कळलं की, काही लोकांचा मृत्यू झालाय. आम्हाला ओळख पटवण्यासाठी नेण्यात आलं. मला तेव्हा कळलं बाबांचा आणि काकांचा मृत्य झालाय. आमच्यासोबत तिथला एक देवासारखा माणूस उभा होता. आम्ही आयुष्यभर त्यांचे उपकार विसरणार नाही. आर्मींने आम्हाला खूप मदत केली. माझे वडिला माझ्या कुटुंबाचे एकमेव आधार होते. घरात तेच कमवते होते. आज मी माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार करून आलेय, यावर माझा विश्वास नाहीये. मला ते सगळं विसरणं खूप अवघड आहे.
माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या. हे माणसं नाहीत, राक्षस आहेत. ते पहाडी मधून आले जंगलातून अचानक आले. चारही बाजूला मृतदेह दिसत होते. ते अतिरेकी कुठून आले सांगू शकणार नाही. फाररिंग करणारे चार ते पाच लोक होते. कलमा वाचून दाखवा अस ते म्हणत होते. त्यांनी माझ्या बाबांना कोणत्या उद्देशाने मारले हे माहित नाही. माझे वडील म्हणत होते, तुम्हाला जे हवंय ते करतो, पण तरीही मारलं. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुणालाही सोडू नका, असं आसावरी यांनी सांगितलं.