Pahalgam Terror Attack: ‘तो’ तिनदा अल्लाहू अकबर म्हटला आणि गोळीबार… हल्ल्याचा गुजरातच्या पर्यटकाने सांगितला थरार

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack)एक व्हिडिओ पर्यटकाच्या मोबाइलमध्ये शूट झालेला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. या हल्ल्याचा तपास करत असलेल्या एनआयएला (NIA)साठी हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. हा व्हिडिओ शूट करणाऱ्या पर्यटकाचे नाव ऋषी भट्ट असे असून, ते गुजरातचे रहिवासी आहेl. त्यांनी संपूर्ण घटनाक्रमच एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितला आहे.
मला वीस सेकंद काही कळलेच नाही
मी, माझी पत्नी व मुलगा आम्ही जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) पर्यटनासाठी गेलो होतो. 22 एप्रिलच्या दुपारी बारा वाजता घोड्यावरून आम्ही पहलगामला गेलो होतो. नऊ जणांनी झिपलाइनवरून स्लाइड केले. मुलाने झिपलाइनम केल्यानंतर मी झिपलाइन करत होता. त्यावेळी ऑपरेटरने तीनवेळा तीनदा ‘अल्लाहू अकबर’ म्हटले. मला सुमारे 20 सेकंदांपर्यंत काय सुरू आहे ते कळले नाही. मी माझा मस्तीत होतो. मला अचानक लक्षात आले की गोळीबार सुरू झाला आहे.जमिनीवर असलेले पर्यटक मारले मारले जात आहेत. मी पाच ते सहा लोकांना गोळ्या घालताना पाहिले. आमच्या समोर असलेल्या दोन कुटुंबातील पुरुषांना त्यांचा धर्म विचारण्यात आला. त्यांनी माझी पत्नी आणि मुलासमोर गोळ्या घालण्यात आल्या. माझी पत्नी आणि मुलगा ओरडत होते. मी झिपलाइन बेल्ट उघडला आणि खाली उडी मारली आणि माझ्या पत्नी आणि मुलाचा जीव वाचविण्यासाठी पळत होतो.
बॉलिवूडकडून सक्षम कलाकारांची हत्या…अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य, जाणून घ्या काय आहे सत्य?
आमच्यासमोर सोळा जणांवर गोळ्या घातल्या…
आम्हाला एका खड्ड्यासारख्या ठिकाणी लोक लपलेले दिसले. आम्हीही तिथे लपलो. आठ ते दहा मिनिटांनी गोळीबार थांबला. तेव्हा आम्ही मुख्य गेटकडे धावू लागलो. अनेक जण जीव वाचविण्यासाठी पळत सुटले होते. चार बाजूने पुन्हा गोळीबार सुरू झाला. त्यावेळी आणखी पाच ते सहा जणांना गोळ्या घालण्यात आल्या. आमच्या समोर 15-16 पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. आम्ही गेटवर पोहोचलो तेव्हा आम्हाला दिसले की स्थानिक जनता आधीच निघून गेली होती. एका गाईडने आम्हाला दूर नेले. तिथून, आम्हाला भारतीय लष्कराचे जवाना येताना दिसले. परंतु हल्लेखोर हे लष्करी गणवेशात असल्याने महिलांना जवानांवर विश्वास बसत नव्हता. महिला घाबरलेल्या होत्या. लष्करी जवानांना आम्हाला विश्वास दिला आहे. त्यानंतर 18 ते 20 मिनिटांत सर्व पर्यटकांना कव्हर केले.
भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तान घाबरला; लष्कर अलर्ट मोडवर
मला झिपलाइन ऑपरेटरवर संशय
माझ्यासमोर नऊ पर्यटकांनी झिपलाइन केले. माझ्या मुलगाही त्यात होता. पण त्यावेळी ऑपरेटर काहीही बोलला नाही. मी सरकत असताना तो अल्लाहू अकबर म्हणून लागला आणि मग गोळीबार सुरू झाला. त्यामुळे मला त्या माणसाबद्दल संशय आहे. त्यावेळी सखल भागात, अगदी जंगलातही सर्वत्र सैन्याची उपस्थिती होती. पण मुख्य ठिकाणी एकही लष्करी अधिकारी नव्हता. जम्मू आणि काश्मीर पोलिस तसेच मुख्य प्रवेशद्वारावर तीन सुरक्षा रक्षक होते. मी हल्ल्याचा वेळ दोन दहशतवाद्यांना बघितले. एक पठाणी कपड्यात होता. त्याने चेहरा झाकलेला होता. तर एक जण लष्करी गणवेशात होता.
#WATCH | #PahalgamTerroristAttack | In a viral video, a tourist was seen ziplining when terrorists suddenly started firing. The tourist from Gujarat's Ahmedabad, Rishi Bhatt, recalls the incident.
"…Firing started when I was ziplining…I did not realise this for around 20… pic.twitter.com/TzauoM7kUe
— ANI (@ANI) April 28, 2025