बाबरीचा बदला घेण्यासाठी दिल्लीत 32 ठिकाणी कार ब्लॉस्टचा कट; दिवस तोच निवडला होता पण…
Red Fort car Blast: बाबरी मस्जिद पाडल्याचा बदला घेण्यासाठी 6 डिसेंबर रोजी दिल्लीतील सहा ठिकाणी दिल्लीत साखळी स्फोट घडवून आणायचा होता.
32 Cars In Red Fort Terrorists’ Chilling Plot For Babri Revenge: दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort car Blast) परिसरात झालेल्या कार स्फोटाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय. बाबरी ( Babri) मस्जिद पाडल्याचा बदला घेण्यासाठी एक मोठा कट रचला होता. दिल्ल्तील 32 ठिकाणी कारमधून स्फोटके नेऊन स्फोट घडवून आणायचे होते. विशेष बाबरी मस्जिद पाडली ते दिवस म्हणजे 6 डिसेंबर हा दिवस त्यासाठी निवडला असल्याची महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. ही माहिती तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचे वृत्त काही हिंदी वृत्तवाहिन्या वेबसाइटने दिल्या आहेत. एनडीटीव्ही इंग्रजीने असे वृत्त दिले आहे. (32 Cars In Red Fort Terrorists’ Chilling Plot For Babri Revenge)
एनडीटीव्हीने सरकारी अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवालाने एक बातमी दिली आहे. त्या बातमीत म्हटलंय की मारुती सुझुका ब्रेझा, मारुती स्विफ्ट डिझायर आणि फोर्ड इकोस्पोर्टसह बत्तीस कार स्फोटक पदार्थ वाहून नेण्यासाठी किंवा बॉम्ब पोहोचवण्यासाठी तयार केल्या जात होत्या. सोमवारी संध्याकाळी स्फोट झालेल्या ह्युंदाई आय 20 सह ही कार त्यातील होती. बाबरी मस्जिद पाडल्याचा बदला घेण्यासाठी हा कट रचला होता. त्यासाठी 6 डिसेंबर रोजी दिल्लीतील सहा ठिकाणी दिल्लीत साखळी स्फोट घडवून आणायचा होता.
मृताच्या नावाने 750 कोटींची शासकीय जमीन 33 कोटींमध्ये विकली; पुण्यात आणखी मोठा जमीन घोटाळा समोर
चार कार सापडल्या
या स्फोटासाठी वेगवेगळ्या कार निवडल्या होत्या. त्यातील काही जुन्या कार्स आहेत. त्या अनेक वेळा विकल्या गेल्या आहेत. ज्यामुळे पोलिसांना त्यांचा शोध घेणे कठीण झाले आहे. यातील चार कार पोलिसांना सापडल्या आहेत. त्यातील ब्रेझा HR87 U 9988 ही कार हरियाणाच्या फरीदाबादमधील अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच्या कॅम्पसमध्ये सापडली आहे. ही संस्था दहशतवाद्यांच्या कारवायांचे केंद्र म्हणून उदयास आली आहे. तर इकोस्पोर्ट कार DL10 CK 0458 ही बुधवारी उशिरा हरियाणाच्या फरीदाबादमध्ये सोडून देण्यात आली. फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा कारवायांचा तळ असल्याचे दिसतंय.
लवकर स्फोट का घडविला ?
लाल किल्ल्याजवळील कार स्फोटात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये उच्च दर्जाचे स्फोटक पदार्थ आणि अमोनियम नायट्रेट इंधन तेलाचे मिश्रणाचे वापर केला होता. उमर मोहम्मद या दहशतवाद्यापैकी एकाने हा स्फोट घडवून आणला आहे. तपासातील अधिकाऱ्यांनी सांगितले की डीएनए चाचण्यांमुळे त्याचा मृत्यू झाल्याची खातरजमा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु जम्मू काश्मीरमध्ये तीन हजार किलो स्फोटके आणि रायफल्स पोलिसांनी जप्त केल्या. त्यात आदिल अहमद राथेर, मुजम्मिल शकील आणि शाहीन सईद यांना अटक केली. त्यानंतर उमर मोहम्दने हा स्फोट घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
