मृताच्या नावाने 750 कोटींची शासकीय जमीन 33 कोटींमध्ये विकली; पुण्यात आणखी मोठा जमीन घोटाळा समोर

Government land scam पिंपरी चिंचवडमध्ये पशुसंवर्धन विभागाची 750 कोटींची 15 एकर जागेची विक्री केवळ 33 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे.

Land

Government land worth Rs 750 crores sold for Rs 33 crores; Another big land scam in Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणुकीचा आरोप होत आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा शासकीय जमिनीचा मोठा कोठा उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विकासाची विभागाची सर्वे नंबर 20 येथील 15 एकर जागा जिचे मूल्य साडेसातशे कोटी रुपये एवढं होतं. त्याची विक्री केवळ 33 कोटी रुपयांमध्ये करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीची 2025 मध्ये हेरंब गुपचूप या नावाच्या व्यक्तीने परस्पर विक्री केली आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडून याबाबतची माहिती जेव्हा पशुसंवर्धन विभागाला कळवण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयोगाने या विषयाची तक्रार पुणे विभागीय आयुक्तांकडे केली. या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धकांकडून चौकशी सुरू आहे.

अल्पसंख्याक बहुल भागांच्या दोन कोटीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता: आमदार आशुतोष काळे

यामध्ये आता हवेलीच्या सहाय्यक दुय्यम निबंधक विद्याशंकर बडे यांना निलंबित करण्यात आला आहे. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे या जमिनीचा व्यवहार करणारी जी व्यक्ती आहे. त्यांचा मृत्यू 1982 मध्ये झाला आहे. त्याच्या 22 वारसदारांनी ही जमीन कपिल छोटं फकीर आणि सय्यद फैयाजमीर अजमुद्दिन यांना 33 कोटी रुपयांत विकली आहे. व्यवहारासाठी त्यांनी पशुसंवर्धन विभागाची कोणतीही एनओसी घेतली नाही. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या परवानगीशिवाय या जागेची विक्री केली जाऊ नये. अशी देखील अट होती. या प्रकरणी आता दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

follow us