अल्पसंख्याक बहुल भागांच्या दोन कोटीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता: आमदार आशुतोष काळे
Ashutosh kale: दोन कोटी निधीतून रस्ते मजबुतीकरण, सांस्कृतिक सभागृह उभारणे, कब्रस्तान सुशोभीकरण व संरक्षण भिंत बांधकाम करणे.
कोपरगाव: कोपरगाव विधानसभा (Kopergaon Assembly) मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागांचा विकास व्हावा व या भागातील नागरीकांना मूलभूत व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यची महायुती शासनाने दखल घेवून अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागांच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी दिली आहे.
कोपरगावमध्ये काळे-कोल्हेंमध्येच लढत ! काका कोयटे राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार
या दोन कोटी निधीतून रस्ते मजबुतीकरण, सांस्कृतिक सभागृह उभारणे, कब्रस्तान सुशोभीकरण व संरक्षण भिंत बांधकाम करणे, शेड व शौचालय बांधकाम करणे आदी कामांचा समावेश आहे. या विकास कामांमुळे अल्पसंख्याक बांधवांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.(Administrative recognition for the development of minority-dominated areas in both areas: MLA Ashutosh Kale)
या विकासकामांमध्ये चासनळी येथे मस्जिद परिसरात शेड व टॉयलेट बांधकाम करणे (२० लक्ष), कोळगाव थडी येथे ग्रामा २९ ते इब्राहीम शेख वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे (३५ लक्ष), वेस येथे मुस्लिम भागात सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे (२० लक्ष), शिरसगाव येथे गोधेगाव रोड शेख वस्ती रस्ता मजबुतीकरण करणे (१० लक्ष), माहेगाव देशमुख येथे ग्रा.मा. २१ (६ चारी रस्ता) ते भिकनभाई सय्यद वस्ती रस्ता मजबुतीकरण करणे (४० लक्ष), रांजणगाव देशमुख येथे मुस्लिम कब्रस्थान सुशोभीकरण करणे व वॉल कंपाऊंड बांधकाम करणे (१० लक्ष), वारी येथे मुस्लिम कब्रस्थान सुशोभीकरण करणे (१० लक्ष), करंजी येथे मुस्लिम बहुल भागात सुशोभीकरण करणे (१० लक्ष), चितळी येथे कब्रस्थान संरक्षण भिंत बांधकाम करणे (२० लक्ष), पुणतांबा येथे चांगदेव नगर ईदगाह मैदान संरक्षण भिंत बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लक्ष), रवंदे येथे कब्रस्थान सुशोभीकरण करणे व सी.डी.वर्क बांधकाम करणे (१५ लक्ष) आदी कामांचा समावेश आहे.
Ahilyanagar Election Observers : अहिल्यानगर जिल्ह्यात चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
महायुती शासनाकडून या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्याबद्दल नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. ०२ कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, अल्पसंख्याक मंत्री ना.माणिकराव कोकाटे यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे. मतदार संघातील सर्वच समाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून यापुढील काळातही विकासकामांचा पाठपुरावा असाच सुरूच राहणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
