गोदाकाठ महोत्सवातून महिलांना हक्काची आर्थिक सावली; आमदार आशुतोष काळे
MLA Ashutosh Kale Organized Godakath Mahotsav : महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव (Kopergaon) येथे गोदाकाठ महोत्सवाचं (Godakath Mahotsav) आयोजन करण्यात आलं होतं. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘गोदाकाठ महोत्सवा’ चे उदघाटन मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) तसेच जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तरूण कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मागील अकरा वर्षापूर्वी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून गोदाकाठ महोत्सवाच्या लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होतंय. ह्या गोदाकाठच्या वटवृक्षात बचत गटाच्या महिलांना हक्काची आर्थिक सावली मिळत आहे, असे गौरवोद्गार आमदार आशुतोष काळे यांनी काढलेत.
Video : धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, फडणवीसांना अल्टिमेटम; बीड प्रकरणात जरांगेंनी उपसली तलवार
यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, गोदाकाठ महोत्सव सुरु झाल्यापासून महिलांना त्यांचे व्यवसाय उभारण्यास, त्यांच्या घरगुती आर्थिक उत्पन्नात भर घालण्यास, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे बचत गटाच्या महिलांना दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाची आस लागलेली असते. दरवर्षी गोदाकाठ महोत्सवात होत असलेल्या आर्थिक उलाढालीचा आकडा वाढतच चालला आहे. बचत गटाच्या महिलांचे आर्थिक उत्पन्न देखील वाढत आहे. त्यांचा आत्मविश्वास देखील वाढलाय, याचे मनस्वी समाधान वाटते. बचत गटाच्या महिलांसाठी वर्षभर प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ विविध उपक्रम राबवून या बचत गटाच्या महिलांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून उद्योग व्यवसायासाठी वित्तपुरवठा मिळवून देत आहे. बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी गोदाकाठ महोत्सव महत्वाची भूमिका बजावत आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आजवर नेहमीच पुढाकार घेतला आहे, यापुढेही घेणार आहे. 2024 च्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काम करण्याची संधी दिली. 2019 च्या निवडणुकीमध्ये केवळ मताधिक्य कमी होते, परंतु मतदार संघाच्या विकासाचा वाढलेला आलेख पाहून मतदारांनी तब्बल ऐतिहासिक अशा 1 लाख 24 हजार 624 मतांनी निवडून दिलंय. त्यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. आपण माझ्यावर पुन्हा एकदा जो विश्वास दाखविला, तो विश्वास सार्थ ठरवून निश्चितपणाने विकासाचे सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
Video : सुनेत्रा पवारांच्या गावाचा उल्लेख, धसांनी धनुभाऊंविरोधातील राखलेला डाव बाहेर काढला
या कार्यक्रमप्रसंगी कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, आशा सेविका, लाडकी बहीण योजनेसाठी मदत करण्याऱ्या स्वयंसेविका यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी विविध शालेय विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवन, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे व्हा.चेअरमन, संचालक, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
महिला बचत गटाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गोदाकाठ महोत्सव सुरु केला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. त्यांची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे, हा गोदाकाठ महोत्सवाचा मुख्य उद्देश गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून साध्य होत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात ‘गोदाकाठ महोत्सव’महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पुष्पाताई काळे म्हणाल्या आहेत.