Video : धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, फडणवीसांना अल्टिमेटम; बीड प्रकरणात जरांगेंनी उपसली तलवार

खंडणीतील आरोपींवर मकोका लागला नसेल तर मकोका आम्हाला मान्य नाही. जेवढे आरोपी आहेत, तेवढ्यावर मकोका लावा.

  • Written By: Published:
Manoj Jarange Patil

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आज या घटनेविरोधात धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलतांना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) एकेरी उल्लेख केला. तसेच सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्र्यांनी दगाफटका केला तर सरकारचा कार्यक्रम करू, असा इशाराही जरांगेंनी दिला.

दादा…याला मंत्रिमंडळातून काढा; धाराशिवच्या जनआक्रोश मोर्चात सुरेश धस मुंडेंवर बरसले 

खंडणीतील आरोपींवरही मकोका लावा – जरांगे

या सभेत बोलतांना जरांगे म्हणाले, आज सर्व आरोपींवर मकोका लागल्याची माहिती आहे. पण, खंडणीतील आरोपींवर मकोका लागला नसेल तर मकोका आम्हाला मान्य नाही. जेवढे आरोपी आहेत, तेवढ्यावर मकोका लावा. या सर्वांना कलम ३०२ मध्ये घेतलं पाहिजे, ही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. यातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर आम्ही त्याच क्षणी हे राज्य बंद पाडू, असंही जरांगे म्हणाले.

पुढं ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. देशमुख कुटुंबाला न्याय देण्याचा शब्द तुम्ही दिला. एकही आरोपी सुटणार नाही, सर्वांवर मकोका लागले, असं तुम्ही म्हणालात. आता जर न्याय मिळाला नाही, तुम्ही दगाफटका केला तर आम्ही सरकारचा कार्यक्रम करू, असं जरांगे म्हणाले.

यावेळी जरांगेंनी कुजलेल्या मृतदेहाचा फोटो दाखवून धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, माणुसकीची हत्या कशी केली जाते ? हे पाहा. या फोटोमधील बॉडीला किडे लागलेत. अजित पवार आणि फडणवीस साहेब, तुमच्या मंत्र्यांच्या गुंडांचे हा प्रताप आहे. कृष्णा कोरे अस या मृत व्यक्तीचं नाव आहे. पण, अजून त्यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही. गृहमंत्री आहेत की, झोपलेत? असा सवाल जरागेंनी केला.

आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी आघाडी तोडण्याचा निर्णय…’; स्वबळाचा नारा दिल्यानंतर आंबेडकरांचा हल्लाबोल 

जरांगेंकडून धनंजय मुंडेंचा उल्लेख ‘धन्या’ असा
यावेळी जरांगेंनी धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख केला. मी कोणालाही काही बोललो नाही. मी कधीही धन्या मुंडेचे नाव घेतले नाही, जो लोकांच्या पोरी छेडण्यास सांगतो, आयाबहिणींची इज्जत घेतो. जो खून करण्यास सांगतो, त्याचे नावही आम्ही तोंडात घेत नाही. पण ज्या दिवशी या लोकांनी धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या, त्या दिवसापासून मी धनंजय मुंडेंच्या मागे लागलो. मुंडेंनी आपले लोक शांत करावेत, अन्यथा धन्या मुंडेची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही. त्याला आता पाणी पाजल्याशिवाय सोडत नसतो, असा इशारा जरांगेंनी दिला.

सातपुडावर बैठक घेणारा मंत्रीही आरोपी – धस
आज ७ जणांना मकोका लागला. एकाला बाजूला ठेवण्यात आलं नाही. त्यांच्यावरही मकोका लावण्यात आला पाहिजे. आका सध्या आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करत असेल, पण तोच मुख्य आहे. वरच्या आकानेही १९ ऑक्टोबरला आपल्या सरकारी सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली होती. ही बैठक घेणारा मंत्री या प्रकरणात आरोपी कसा नाही? असा सवाल धस यांनी केला.

follow us