Udan Nari Shakti Run : “उडान नारीशक्ती रन” यशस्वी: महिलांचा उत्साहाला उधाण..
Udan Nari Shakti Run : महिलांच्या आरोग्य आणि सशक्तीकरणासाठी आयोजित केलेला “उडान नारीशक्ती रन” उत्साह आणि जल्लोषात यशस्वीपणे पार पडला. बाणेर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, ताम्हाणे चौक येथे झालेल्या या उपक्रमाने महिलांचा प्रचंड सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवली.
कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील (उच्चतंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य), सुनेत्रा पवार (खासदार), शंकर मांडेकर (आमदार, भोर-मुळशी-राजगड मतदारसंघ) आणि रूपाली चाकणकर (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस) तसेच श्रुती मराठे (सिने अभिनेत्री) इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. महिलांनी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि एकत्र येऊन उत्साहाने सहभाग नोंदवला.
चौदा हजार सहाशे महिलांनी विक्रमी सहभाग नोंदवला. उपक्रमाने महिलांच्या सशक्तीकरणाला नवी दिशा दिली असून, त्यांच्या आरोग्यासाठी सकारात्मक बदल घडवण्याचे काम केले आहे. या उडान रन मध्ये 81 वर्षांच्या एका आजींनी सहभाग नोंदवला तसंच सात महिन्यांची गर्भवती महिलासुद्धा या रन मध्ये सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मोठी दुर्घटना, प्लांटची चिमणी कोसळली, 30 कामगार अडकले
कार्यक्रमाची संपूर्ण यशस्विता पूनम विशाल विधाते आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे साध्य झाली आहे. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि महिलांनी व्यक्त केलेल्या आनंदाने हा उपक्रम संस्मरणीय ठरला.
खरेदी, मनोरंजन व खाद्यपदार्थाची रेलचेल असलेल्या ‘गोदाकाठ महोत्सवास’ 10 जानेवारीपासून होणार सुरुवात