भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तान घाबरला; लष्कर अलर्ट मोडवर

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने (Government of India) पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल करार (Indus Water Treaty) रद्द केला तसेच भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देत त्यांचे व्हिसा रद्द केले आहे. तर आता भारत सरकार लष्करी पर्यायचा विचार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यापूर्वीच पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत कधीही हल्ल करु शकतो अशी शक्यता पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ (Khwaja Asif) यांनी एका मुलाखतीमध्ये वर्तवली आहे.
भारत हल्ला करणार या भीतीमुळे पाकिस्तानचे सैन्य (Pakistan Military) अलर्ट मोडवर ठेवले आहे. भारताकडून कधीही हल्ला होऊ शकतो असं पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी सोमवारी रॉयटर्सशी बोलताना सांगितले. आम्ही आमच्या सैन्याला बळकटी दिली आहे कारण ही एक संभाव्य घटना आहे जी आता घडणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, म्हणून ते निर्णय घेण्यात आले आहेत. असं या मुलाखतीमध्ये पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ म्हणाले.
या मुलाखतीमध्ये पढे बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, भारताकडून वक्तव्य वाढत आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराने भारताच्या हल्ल्याच्या शक्यतेची माहिती सरकारला दिली आहे. मात्र भारताकडून पाकिस्तानवर हल्ला का? होऊ शकतो याची माहिती त्यांनी दिलेली नाही.
मोठी बातमी, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
तर दुसरीकडे 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तानचा हात असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात बसला आहे. याची देखील माहिती भारत सरकारला मिळाली असल्याने भारत सरकारकडून आता लष्करी कारवाईच्या पर्यायवर विचार केला जात असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.