Download App

Home Loan : होम लोन घेताय मग आधी ‘या’ गोष्टी कराच; फायदाच होईल

आपलं एखादं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी होम लोन मोठा (Home Loan Tips) आधार ठरतो.

Home Loan Tips : आपलं एखादं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी होम लोन मोठा (Home Loan Tips) आधार ठरतो. बहुतांश लोक कर्ज काढून घर खरेदी करतात. पण बँका किंवा वित्तीय संस्था या कर्जावर भरभक्कम व्याज घेतात. त्यामुळे जर तुम्ही कमी व्याजदरावर (Interest Rate) कर्ज घेतले असेल तरच त्याचा फायदा राहील. व्याजदर कमी असेल तर तुमचा कर्जाचा हप्ता देखील कमी राहतो. ईएमआयमध्ये मुद्दल (Loan EMI) रकमेसह व्याज देखील असते. त्यामुळे आता जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर आधी या गोष्टी नक्की करा.

क्रेडिट स्कोअर बनेल आधार

क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर (CIBIL Score) कर्जाचे सहकारी असतात. सिबिल स्कोअरच्या माध्यमातून संबंधित अर्जदार कर्ज फेडण्याच्या क्षमतेत आहे की नाही याची माहिती बँका घेतात. जर क्रेडिट स्कोअर (Credit Score) कमी असेल तर बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. पण चांगला क्रेडिट स्कोअर असणाऱ्या व्यक्तीला कमी व्याजदरात कर्ज मिळते. त्यामुळे कर्ज घेण्याआधी क्रेडिट स्कोअर नक्की चेक करा.

Joint Home Loan : जॉइंट होम लोन घेणे किती योग्य? जाणून घ्या, फायद्याचं गणित

जॉइंट लोन घ्या

जॉइंट लोन घेण्याचे (Joint Loan) अनेक फायदे असतात. जर तुम्ही आई, पत्नी किंवा बहिणीसह जॉइंट कर्ज घेतले तर व्याज कमी आकारले जाईल. त्यामुळे होम लोन घ्यायचे असेल तर बँकेकडून आधी जॉइंट लोन बाबत सविस्तर माहिती घ्या.

जॉब बदलत राहणे टाळा

बँक लोन देताना संबंधित अर्जदाराचे स्थिर उत्पन्न आणि अन्य आवश्यक माहिती घेते. तुम्ही कोणते काम करता आणि याआधी कोणत्या ठिकाणी नोकरी केली आहे. जर तुम्ही वारंवार जॉब बदलत असेल तर त्याचीही माहिती बँकेकडून घेतली जाते. त्यामुळे सारखे सारखे जॉब बदलण्याच्या भानगडीत पडू नका. कर्ज घेण्याआधी या गोष्टींचा नक्की विचार करा.

IMF कडून पाकिस्तानला कर्ज, भारताने विरोध केला पण मतदानाकडे पाठ; नेमकी स्टोरी, घ्या जाणून

follow us