Download App

फक्त एस 400 नाही, ‘या’ 5 डिफेन्स सिस्टीम्सने पाकिस्तानला फोडला घाम; ड्रोन अन् मिसाइल हल्ले फेल

पाकिस्तानने मंगळवारी रात्री जम्मू, उधमपूर, सांबा, अखनूर, नगरोटा, पठाणकोट भागात ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले.

India Pakistan War : पाकिस्तानने मंगळवारी रात्री जम्मू, उधमपूर, सांबा, अखनूर, नगरोटा, पठाणकोट भागात ड्रोन आणि (India Pakistan War) मिसाईल हल्ले केले. परंतु भारताच्या सतर्क एअर डिफेन्स सिस्टीममुळे यातील एकही ड्रोन किंवा मिसाईल जमिनीवर पडू शकले नाही. डिफेन्स सिस्टीमने या हत्यारांना हवेतच नष्ट करून टाकले. भारतीय सैन्याने (Indian Army) जम्मू काश्मीर, पंजाब आणि देशाच्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तानचा (Jammu Kashmir) हल्ला विफल केला.

सैन्याचे एअर डिफेन्स युनिटने ड्रोन हल्ले रोखण्यासाठी ‘L 70 गन’, ‘Zu 23mm सिस्टम’, ‘शिल्का सिस्टम’, ‘काउंटर UAS उपकरणे’ आणि ‘S 400 सुदर्शन चक्र’ यांसारख्या हत्यारांचा वापर केला. सैन्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना सांगितले की भारतीय सैन्य देशाचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

भारतीय सैन्याच्या एअर स्ट्राइकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने काल भारताच्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. नियंत्रण रेषेवरही (LOC) सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारताने जशास तसे उत्तर दिले. ड्रोन हल्ले रोखण्यासाठी भारताने जय्यत तयारी केली. सैन्याच्या ज्या हत्यारांनी पाकिस्तानचे सर्व ड्रोन आणि मिसाईल हल्ले परतवून लावले त्या हत्यारांची माहिती घेऊ या..

India-Pak War : पाकिस्तानची आता खैर नाही; मोदी सरकारचा लष्करप्रमुखांना विशेष अधिकार

L 70 गन

40mm अँटी एअरक्राफ्ट गन स्वीडनची कंपनी बोफोर्सने तयार केली आहे. हवेतून वेगाने हल्ला करणाऱ्या टार्गेटना नष्ट करण्यात ही गन प्रभावी आहे. भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या गन आणखी सक्षम केल्या आहेत.

Zu 23 mm सिस्टम

सोव्हिएत युनियनच्या काळातील ही अँटी एअरक्राफ्ट गन दोन बॅरलची आहे. कमी उंचीवरून उडणाऱ्या टार्गेटना टिपण्यात या गनची उपयुक्तता आहे. या गनला रडार आणि ऑप्टिकल टार्गेटिंग सिस्टमशी जोडता येऊ शकते.

शिल्का सिस्टम

शिल्का सिस्टम एक रडार निर्देशित ऑटोमॅटिक अँटी एअरक्राफ्ट वेपन सिस्टीम आहे. यामध्ये चार 23mm ऑटो कॅनन आणि एक रडार सिस्टम बसवलेले असते. ही प्रणाली एकच वेळी अनेक टार्गेट ट्रॅक आणि नष्ट करू शकते. भारतीय सैन्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिल्का सिस्टीमला मॉडीफाय केले आहे.

काउंटर UAS सिस्टीम

ड्रोन आणि अन्य मानवरहित सिस्टमचा धोका ओळखून भारत सरकारने काउंटर UAS सिस्टीमही तैनात केले आहे. या प्रणालीत रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सर असतात. यामुळे ड्रोनचा शोध घेतला जाऊ शकतो. या सिस्टीम मध्ये जॅमर आणि डायरेक्टेड एनर्जी वेपन सुद्धा असतात. या उपकरणांच्या मदतीने ड्रोन निष्क्रिय केले जातात.

S 400 सुदर्शन चक्र

एस 400 डिफेन्स सिस्टीम रशियाकडून खरेदी करण्यात आले आहे. या सिस्टिमला भारताने सुदर्शन चक्र नाव दिले आहे. एस 400 सिस्टिम 400 किलोमीटर दूरवरील टार्गेटला टिपू शकते. इतकेच नाही तर या सिस्टिमच्या मदतीने 600 किलोमीटरवरील टार्गेटचा शोध घेतला जाऊ शकतो. रशियाची कंपनीने ही सिस्टिम विकसित केली आहे.

ऑपरेशन सिंदूर सुरू असतानाच ट्रेंड होतंय ‘IC 814’; जाणून घ्या, कंधार विमान हायजॅकची कहाणी..

भारताने 2018 मध्ये एस 400 डिफेन्स सिस्टिम रशियाकडून 5.43 बिलियन डॉलरमध्ये खरेदी केली होती. या करारात भारताला रशियाकडून पाच एस 400 युनिट मिळाले आहेत. पहिली सिस्टिम 2021 मध्ये पंजाबमध्ये तैनात करण्यात आली. सुदर्शन चक्र चार वेगवेगळ्या मिसाइल्सना सपोर्ट करते. या सिस्टिमच्या मदतीने विमाने, ड्रोन, क्रूज मिसाइल्स आणि बॅलेस्टिक मिसाइल्सनाही टिपता येऊ शकते.

follow us