Download App

पाकिस्तान टीमचा दहशतवाद्यांना पाठिंबा! ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्यांच्या कुटुंबाला दान करणार मॅच फिस

Pakistan team त्यांची मॅच फीस ऑपरेशन सिंदूरच्या पिडीतांना दान करणार. ही मदत सामान्य नागरिकांना नाही तर दहशतवाद्यांना असल्याचं स्पष्ट आहे.

  • Written By: Last Updated:

Asia Cup 2025 Pakistan team will donate Match fees to families of those killed in Operation Sindoor : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला चितपट करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. पहिल्यापासूनच भारतीय संघाने (Team India) आक्रमक पवित्रा घेतला होता. पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) ‘नो हँडशेक पॉलिसी’ ते थेट आशियाई क्रिकेट परिषद (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. दुसरीकडे पाकिस्तान टीम मात्र त्यांचे रंग दाखवतच आहे. त्यांनी आता थेट दहशतवाद्यांना पाठिंबा देत मॅस फिस दहशतवाद्यांच्या कुटुंबाला देण्याची घोषणा त्यांच्या कॅप्टनकडून जाहीरपणे करण्यात आली आहे.

Video : PM मोदींकडून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली का?; विजयी टीम इंडिया राऊतांच्या रडारवर

पाकिस्तान टीमचा कॅप्टन सलमान अली आगा याने घोषणा केली. त्याने सांगितलं की, पाकिस्तानी टीम त्यांची मॅच फीस भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला दान करणार आहे.मात्र यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचं कुटुंब आणि लष्कर ए तैयबाचे दहशतवादी देखील यामध्ये मारले गेले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला केला होता. त्यामध्ये सैन्याचे जवान आणि अधिकारी मारले गेले होते. त्यामुळे पाक टीमची ही मदत सामान्य नागरिकांना नाही तर दहशतवाद्यांना असल्याचं स्पष्ट आहे.

Asia Cup Trophy Controversy: टीम इंडियाला ट्रॉफी कधी मिळणार? BCCI चं मोहसीन नकवींना अल्टिमेटम

दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील लोक मारले गेले होते. ज्यामध्ये त्याचे दोन मेव्हणे जे कंधार हायजॅकमधील यूसुफ अजहर आणि बहावपूरमधील जैश हेडक्वार्टरचा संचालक मोहम्मद जमील अहमद सहभागी होते. तसेच जैश हेडक्वार्टरमध्ये राहणारा त्याचे संचालन करणारा हमजा जमील जो जमील अहमदचा मुलगा होता. तर अफगानिस्तान आणि खैबर पख्तूनख्वाहमध्ये जैश ए मोहम्मदचं काम पाहणारा मसूद अजहरच्या भावाचा दत्तक मुलगा हुजैफ अजहर देखील मारला गेला होता.

राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू – भाजप नेत्याची खुलेआम धमकी, त्यानंतर…

त्यामुळे पाकिस्तान टीमने मॅचची फीस दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जो सामान्य नागरिकांसाठी नसून थेट ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांसाठी आहे. मात्र पाकिस्तानचं हे दहशतवाद्यावरील प्रेम पहिल्यांदा नाही. तर या अगोदर पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि माजी पंतप्रधान इमरान खान याने तालिबानला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याला तालिबान खान नावाने ओळखलं जात होतं. त्यानंतर आता तर पाकिस्तान टीमने सामन्या दरम्यान टीमने थेट ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांना मॅचची फीस दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

follow us